2024 मध्ये असं होणार तरी काय? जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी लोकं शोक करणं विसरतील!

मुंबई तक

Reviving The Dead: जगभरात जिवंत नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखल्या जाणार्‍या एथोस सॅलोमने 2024 साठी एक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितले आहे की 2024 मध्ये काय होईल, ज्यामुळे लोक त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूनंतरही शोक करणार नाहीत.

ADVERTISEMENT

what will happen in 2024 predictions nostradamus
what will happen in 2024 predictions nostradamus
social share
google news

What is going to happen in 2024 year: जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रिय व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर लोक शोक करतात. जो जातो तो परत येत नाही. काळानुसार दुःख कमी होते आणि लोक पुन्हा पूर्वीसारखे जीवन जगू लागतात. लोक त्यांचे दु:ख स्वीकारतात. हळूहळू आपण त्या व्यक्तीला विसरायला लागतो. तो जिवंत असताना त्याची कितीही सवय झाली असेल. पण समजा, लोकांनी शोक करणंच थांबवलं तर? म्हणजे एखाद्याच्या मृत्यूनंतर लोकांनी दुःख व्यक्त करणंच सोडलं तर? (people will forget to mourn after the death of their loved ones what is going to happen in 2024 year )

आता हे कसे होऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, हे 2024 मध्ये होऊ शकते. भविष्य पाहण्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने हे सांगितले आहे. Athos Salomé असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो ब्राझीलमध्ये राहतो. त्याच्या भविष्यवाणीमुळे, त्याला जिवंत नास्ट्रेडमस देखील म्हटले जाते. त्याची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. यात गेल्या वर्षी राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूपासून ते इलॉन मस्कने त्याचे ट्विटर हे X मध्ये बदलण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

एथोसने आता 2024 वर्षासाठी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की 2024 मध्ये एक क्रांती होईल, ज्यामध्ये लोक एआयच्या मदतीने बोलू शकतील. हा कल्पनेपलीकडचा प्रवास असेल. कल्पना करा की, एखाद्या मृत नातेवाईक किंवा मित्राशी बोलण्यास आपण सक्षम आहात. तसेच आपल्या मागील जीवनाशी संबंधित रहस्ये जाणून घ्याल. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील नाविन्यामुळे हे सर्व शक्य होणार आहे.

हे ही वाचा>> Cabbage tapeworm : कोबीमुळे मेंदूत किडे घुसतात? डॉक्टरांनी सांगितलं तरी काय?

तो म्हणाला की, हे तंत्रज्ञान केवळ वैज्ञानिक प्रगती नाही तर मानवी प्रवास समजून घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हे अस्तित्वाची रहस्ये उलगडून दाखविण्याचे, सांत्वन देण्याचे आणि आपल्या जीवनाच्या ध्येयाची सखोल माहिती देण्याचे वचन देते. पण यासाठी आपण किती तयार आहोत? तज्ज्ञ या पैलूचे वैद्यकीय परिणाम आणि नैतिक समस्यांचे निरीक्षण आणि वादविवाद करत आहेत. आपण आध्यात्मिक आणि अस्तित्वाच्या क्रांतीच्या मार्गावर आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp