Pune Crime : बेरोजगारीमुळे मेेकॅनिकल इंजिनीअने सुरू केली चोरी, पोलिसांनी तब्बल 56 दुचाकी केल्या जप्त

मुंबई तक

मोरवाडी मेट्रो स्थानकाजवळ एक संशयित दुचाकी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पिंपरी पोलिसांनी सापळा रचून संतोष मारुती शिंदे याला पकडलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बेरोजगारीला कंटाळून तरूणानं सुरू केली चोरी

point

पुण्यातील मेकॅनिकल इंजिनीअर तरूणाला अटक

point

पोलिसांनी जप्त केल्या 56 दुचाकी, एकूण किती चोरल्या?

Pune Crime News : पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका मेकॅनिकल इंजिनीअरसह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 26 लाख रुपये किमतीच्या 53 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईतून पोलिसांनी 35 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. संतोष मारुती शिंदे, धीरज प्रदीप सावंत आणि बालाजी उर्फ ​​तात्यासाहेब दादा भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी धीरज प्रदीप सावंत हा मेकॅनिकल इंजिनीअर आहे. बेरोजगारीमुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचं चौकशीत उघड झालं. या टोळीने विशेषत: स्प्लेंडर बाइक्सला टार्गेट केलं आणि चोरीची वाहनं पुणे जिल्ह्याबाहेरील ग्रामीण भागात 10,000 ते 15,000 रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे. 

हे ही वाचा >> Fact Check: नितेश राणे म्हणाले शिवरायांसोबत मुस्लिम नव्हतेच, आता ‘ही’ यादीच आली समोर.. काय आहे सत्य?

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना हा सुगावा लागला.

मोरवाडी मेट्रो स्थानकाजवळ एक संशयित दुचाकी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पिंपरी पोलिसांनी सापळा रचून संतोष मारुती शिंदे याला पकडलं. संतोषची चौकशी करुन, सीसीटीव्ही फुटेजमधली माहिती गोळा करुन त्याचे साथीदार धीरज आणि बालाजी यांनाही अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp