"थँक यू PM सर...", चिठ्ठी लिहून रूबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरने स्वत:ला संपवलं, कुटुंबाचे आरोप काय?

मुंबई तक

गुजरातमधील भावनगर येथील रहिवासी असलेले डॉ. श्याम पंकज वोरा हे 2023 पासून रुबी हॉल क्लिनिकच्या रेडिओलॉजी विभागात इंटर्नशिप करत होते. डॉ. प्रणव महादेवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते इंटर्नशिप करत होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

रूबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरने स्वत:ला संपवलं

point

चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला मोबाईलचा पिन कोड

Pune Ruby Hall Doctor Suicide Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशातच आता रुबी हॉल क्लिनिकमध्ये 28 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या डॉक्टरच्या मृत्यूवर मात्र संशय व्यक्त केला जातोय. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून डॉक्टरने हे पाऊल उचललंय का याची पोलीस चौकशी करत आहेत. डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या विभागप्रमुखाचं नाव ‘पी.एम.’ असं संक्षिप्त रूपात लिहिलं असून, “थँक यू फॉर ऑल” असा संदेशही दिलाय. 

चिठ्ठीमध्ये काय लिहिलं?

गुजरातमधील भावनगर येथील रहिवासी असलेले डॉ. श्याम पंकज वोरा हे 2023 पासून रुबी हॉल क्लिनिकच्या रेडिओलॉजी विभागात इंटर्नशिप करत होते. डॉ. प्रणव महादेवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते इंटर्नशिप करत होते. रविवारी रात्री 10 च्या सुमारास पीजी डॉक्टर्सच्या वसतिगृहात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

हे ही वाचा >> सोनमने प्रॉपर प्लॅन केला, प्रियकराला इंदोरमध्येच थांबवून मारेकऱ्यांना... पोलीस चौकशीत मोठा खुलासा

डॉ. वोरा यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, “मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय. कुणालाही काहीही सांगू शकत नाही…” त्यांनी त्यांच्या मोबाइलचा पिन नंबरही या चिठ्ठीत लिहिलाय. “कृपया हा पिन माझ्या कुटुंबाला द्या” असं त्यांनी म्हटलंय. तसंच, त्यांनी यूपीआय पिन देखील लिहिला आणि नोटचा शेवट “थँक यू पी.एम. सर फॉर ऑल” असा केलाय.

वडिलांचे गंभीर आरोप

पुणे टाइम्स मिररने डॉ. श्याम वोरा यांचे वडील पंकज वोरा यांच्याशी संपर्क साधला असता, वडिलांनी सांगितलं की, त्यांनी विभागप्रमुखाला 40 हून अधिक कॉल केले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. “माझा मुलगा गेल्या दीड महिन्यांपासून निराश होता. तो सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व शिफ्ट्समध्ये काम करत होता. त्याने मला सांगितलं होतं की, विभागप्रमुखांनी त्याला काही टार्गेट्स दिली होती. आम्हाला पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी आहे.

हे वाचलं का?