महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

11 people die of heat stroke after attending Maharashtra Bhushan Award ceremony in Navi Mumbai
11 people die of heat stroke after attending Maharashtra Bhushan Award ceremony in Navi Mumbai
social share
google news

नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. यात 11 श्री सदस्यांचा मृत्यू झाला असून, कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उष्माघात झालेल्या काही जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचार घेत असलेल्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. दरम्यान, मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 8 जणांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांची नाव प्रसिद्ध केली आहेत. (11 people died due to a heat stroke after attending Maharashtra Bhushan Award ceremony in Navi Mumbai)

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो लोक आले होते. उन्हाचा पारा वाढलेला असतानाच हा कार्यक्रम पार पडला. सकाळी 10 वाजेपासून लोकांनी गर्दी केली होती. दुपारी 1.30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला.

हेही वाचा >> महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; 11 जणांचा मृत्यू, CM शिंदेंनी सांगितलं कारण

दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. त्यापैकी काहींना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र भूषण सोहळा : मृत पावलेल्या व्यक्तींची नावे

खारघर येथील सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या आणि उष्माघातामुळे मृत पावलेल्यांपैकी 8 महिला असून, 3 पुरुष आहेत. एकूण 11 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
उर्वरित तीन मृतांमध्ये महिला असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.

Maharashtra Bhushan Award : प्रशासनाचे आवाहन

बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी ‘हरवले व सापडले’ समितीचे प्रमुख 7977314031 व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 022-27542399 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT