Bank Holidays in September 2023 : बँक कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’, फक्त 15 दिवसच काम

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

bank holidays 2023 september : bank will be closed 16 days of september
bank holidays 2023 september : bank will be closed 16 days of september
social share
google news

Bank Holidays In September 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सप्टेंबर महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही प्रादेशिक सुट्ट्यांसह बंद राहतील. माहितीसाठी राज्यानुसार या प्रादेशिक सुट्ट्या ठरतात. म्हणजेच या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सण आणि उत्सवांवर अवलंबून असतात. (16 Days Bank Holidays For Bank Employees in The Month Of September 2023)

त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी जरूर पाहा. सप्टेंबर महिन्यात अनेक सण असतात. तसंच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह या महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल.

Chandrayaan-3 : विक्रम लँडरवर ‘सोनेरी कोटिंग’ का लावलं जातं तुम्हाला माहितीये का?

सप्टेंबर महिन्यात 16 दिवस बँका राहाणार बंद!

एकदा उन्हाळा संपला की, भारतात सर्व सणांना सुरूवात होते. अशात सप्टेंबर महिन्यात महत्त्वाचे सण साजरे केले जातात आणि यावर्षी या महिन्यात बॅंकाना भरमसाठ सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची तर मज्जाच झाली आहे. कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद या सणांमुळे बॅंका बंद असतील. अशावेळी जर तुम्हाला बँकेसंबंधित कोणतं महत्त्वाचं काम करायचं असेल तर सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच काम पूर्ण करण्याचं नियोजन करा. नाहीतर तुमची बँकेतील फेरी वाया जाईल. चला तर मग या सुट्ट्यांची लिस्ट जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Chandrayaan 3 Pragyan Rover on Moon : प्रज्ञानचा ‘मूनवॉक’! चंद्रावर उतरतानाचा पहिला व्हिडीओ

सप्टेंबरमध्ये कोणत्या दिवशी असणार सुट्ट्या?

  • 3 सप्टेंबर 2023- रविवार असल्यामुले बँका बंद राहतील.
  • 6 सप्टेंबर 2023- भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँका बंद राहतील.
  • 7 सप्टेंबर 2023- श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँक सुट्टी असेल.
  • 9 सप्टेंबर 2023- दुसऱ्या शनिवारमुळे सर्व बँका बंद राहतील.
  • 10 सप्टेंबर 2023- रविवारमुळे सर्व बँकांना सुट्टी असेल.
  • 17 सप्टेंबर 2023- रविवारमुळे सर्वच बँका बंद राहतील.
  • 18 सप्टेंबर 2023- विनायक चतुर्थीमुळे बंगळुरू, तेलंगणा येथे बँका बंद राहतील.

Kolhapur Crime News : छेडछाड करणाऱ्या तरुणांना पोलिसांआधीच जमावाने घडवली अद्दल

  • 19 सप्टेंबर 2023- गणेश चतुर्थीमुळे अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील.
  • 20 सप्टेंबर 2023- कोची आणि भुवनेश्वरमध्ये गणेश चतुर्थी आणि नुआखाईमुळे बँका बंद राहतील.
  • 22 सप्टेंबर 2023- श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.
  • 23 सप्टेंबर 2023 – चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
  • 24 सप्टेंबर 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील.
  • 25 सप्टेंबर 2023- श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीनिमित्त गुवाहाटीतील बँकांना सुट्टी असेल.
  • 27 सप्टेंबर 2023- मिलाद-ए-शरीफनिमित्त जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.
  • 28 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलादमुळे अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इम्फाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँका बंद राहतील. .
  • 29 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT