8 December 2024 Gold Rate : ग्राहकांनो! पटापट सोनं खरेदी करा; लग्नसराईत सोन्याच्या भावात मोठी घसरण
Today Gold And Silver Rate: सोनं-चांदीच्या किमतीत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात सोनं 350 रुपयांहून जास्त स्वस्त झालं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली घसरण?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
24 आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव वाचून थक्कच व्हाल
Today Gold And Silver Rate: सोनं-चांदीच्या किमतीत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात सोनं 350 रुपयांहून जास्त स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या किंमतीत 1 रुपयांहून अधिकची घसरण झाल्याचं समोर आलंय. रविवारी आज 8 डिसेंबरला सोनं-चांदीचे भाव फ्लॅट आहेत. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या सोन्याचा भाव 71 हजारांपार आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात वेडिंग सीजनमुळे सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडणार आहेत. चांदीच्या भावात आज रविवारी कोणतीही घट झालेली नाही. 8 डिसेंबरला एक किलोग्रॅम चांदीचा भाव 92000 रुपयांवर पोहोचला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77890 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपयांवर पोहोचली आहे.
दिल्ली
दिल्ली 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77770 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपयांवर पोहोचली आहे.










