Nagpur : ‘पैसे द्या, शिंदे सरकारमध्ये मंत्री बनवतो’, भाजप आमदारांकडे मागितले कोट्यवधी
तुम्हाला मंत्री बनवतो, असे सांगून एका व्यक्तीने भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याकडे पैसे मागितले. नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड नावाच्या व्यक्तीला अहमदाबाद येथून अटक केली आहे.
ADVERTISEMENT

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए आहे असं सांगून एका भामट्याने महाराष्ट्रातील भाजप आमदारांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. नड्डा यांचा पीए असल्याचं सांगून शिंदे सरकारमध्ये मंत्री करतो. कर्नाटकातील सरकार स्थापनेसाठी पैसे तयार ठेवा, असं सांगत या भामट्याने भाजपच्या चार कोट्यवधी रुपयांची मागणी केली. या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी राजस्थानातील अहमदाबाद येथील रहिवाशी आहे.
भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा डाव
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमधील मोरबीचा रहिवाशी असलेल्या नीरज सिंह राठोड यांने महाराष्ट्र, नागालँड आणि गोव्यातील आमदारांना मंत्री करण्याचं आमिष दाखवून पैसे लाटण्याचा डाव रचला होता. आरोपींने भाजप आमदारांना पैसे तयार ठेवण्यास सांगितलं होतं.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी नीरज राठोड याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.