Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहनांचा भीषण अपघात; अनेक जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीनजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ११ गाड्या एकमेकांना धडकल्या असून 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सध्या कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. (Accident near Khopoli on Mumbai-Pune Expressway, 11 cars collided with each other)

ADVERTISEMENT

अपघातानंतर फायर विभाग आणि आयआरबीच्या टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत. याशिवाय स्थानिकांकडून अपघातातील जखमींना मदत केली जात आहे. दरम्यान, वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकने स्वीफ्ट इर्टिगा अशा वेगवेगळ्या 11 वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे. बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT