Ajit Pawar Health : अजित पवारांना डेंग्यू, प्रफुल्ल पटेलांनी काय दिली माहिती?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Ajit pawar healt update : he diagnosed with dengue
Ajit pawar healt update : he diagnosed with dengue
social share
google news

Ajit Pawar dengue News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती पटेलांनी दिली आहे. (Ajit Pawar has been diagnosed with dengue)

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या माध्यमांतून समोर आल्यानंतर प्रफुल्ल पटेलांकडून यावर खुलासा करण्यात आला आहे. अजित पवार अचानक सार्वजनिक कार्यक्रमात दिसून न आल्याने माध्यमांमधून वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे अजित पवार पुन्हा गायब झाल्याची चर्चा सुरु झाली होती.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

अजित पवारांबद्दल वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली असून, पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचंही सांगितलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> NCP : ‘अपात्र का करू नये?’, शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार!

“अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना गैरहजर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून दाखवण्यात आल्या आहेत. या बातम्यांबद्दल मी स्पष्ट करू इच्छितो की, त्यांना काल (२८ ऑक्टोबर) डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालं आहे. डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. ते पूर्णपणे बरे झाले की, जनसेवेचे काम पूर्ण ताकदीशी सुरू करतील”, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> काँग्रेस आमदाराच्या घरात आढळला तरूणाचा मृतदेह; हत्येचा संशय

ADVERTISEMENT

अजित पवारांचं आजारपण अन् राजकीय चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारपणाचा संबंध राजकारणाशी जोडला गेला आहे. पालकमंत्री पदावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि अजित पवार गटात वाटाघाटी सुरु होत्या. त्याच वेळी अजित पवार आजारी पडले होते. अजित पवार नाराज असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. त्यानंतर लगेच पालकमंत्री जाहीर करण्यात आले. यात अजित पवारांकडे पुण्याचे पालकमंत्री पदाची सुत्रे आली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT