Ajit Pawar : भाजपसोबत जाण्याच्या चर्चादरम्यान पवारांचं एकनाथ शिंदेंना खरमरीत पत्र

मुंबई तक

अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खरमरीत पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील उपस्थित 13 श्री सदस्यांच्या मृत्यूसाठी अजित पवारांनी सरकारवर ठपका ठेवला आहे.

ADVERTISEMENT

ajit pawar hits out eknath shinde over 13 died in maharashtra bhushan programme
ajit pawar hits out eknath shinde over 13 died in maharashtra bhushan programme
social share
google news

महाराष्ट्रात अजित पवारांच्या नॉट रिचेबल होण्याने पुन्हा राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झालं आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 34 आमदारांचा पाठिंबा असून, ते भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहे, यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, या चर्चेच्या दरम्यान, अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खरमरीत पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील उपस्थित 13 श्री सदस्यांच्या मृत्यूसाठी अजित पवारांनी सरकारवर ठपका ठेवला आहे. (Ajit Pawar Letter To CM Eknath Shinde on Maharashtra Bhushan ceremony)

अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा 16 एप्रिल 2023 रोजी खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे 20 लाख अनुयायी उपस्थित होते.”

नाहक बळी गेले, अजित पवारांनी काय म्हटलंय?

मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलेलं आहे की, “सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. तब्बल 7 तास लाखांहून अनुयायी उन्हात होते. अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत 13 निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला. घटनेच्या दिवशीच मी स्वतः नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि डॉक्टरांची भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.”

निष्पाप अनुयायांच्या जीवाशी खेळण्याचं काम -अजित पवार

“राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रचंड मोठी लाट आलेली आहे. डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रात आहेत. साहजिकच अशा प्रकारच्या सोहळ्याला लाखो अनुयायी उपस्थित राहतील, ही धारणा लक्षात घेणे गरजेचे होते. एवढा मोठा कार्यक्रम, मोकळ्या मैदानावर, दुपारच्या वेळी आयोजित करून निष्पाप अनुयायांच्या जीवाशी खेळण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आहे, अशी भावना आज सर्वसामान्यांची झाली आहे”, असं म्हणत अजित पवारांनी या घटनेवरून सरकारला सुनावलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp