Fruit Beer च्या नावाखाली नशेचा बाजार.. कोणी केला करेक्ट कार्यक्रम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

alcoholic products were being sold under the name of fruit beer solapur police took a big action
alcoholic products were being sold under the name of fruit beer solapur police took a big action
social share
google news

Alcoholic Drink Fruit Beer Solapur Crime: विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापूर (Solapur) शहरात फ्रूट बियरकडे (Fruit Beer) तरुणाई आकर्षित होत आहे. पण फ्रुट बियरच्या नावाखाली सोलापुरात भलताच उद्योग सुरू असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. फ्रूट बियर म्हणून विक्री होत असलेल्या बाटल्या आता राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी माहिती देताना सांगितले, प्राथमिक तपासणीनुसार जप्त केलेल्या बाटल्यांमध्ये फ्रूटसारखा किंवा फळांसारखा कोणताही पदार्थ नाही. त्यामध्ये यीस्ट, साखर व ज्येष्ठ मध आणि अल्कोहोलिक पदार्थ (alcoholic products) आहेत. (alcoholic products were being sold under the name of fruit beer solapur police took a big action)

सोलापूर शहरातील महाविद्यालय परिसरात फ्रूट बियरच्या बनावट बाटल्या विक्री होत आहेत. या दोन बाटल्यांमधील द्रव्याचं सेवन केलं की जबरदस्त गुंगी चढते अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. बियर, व्हिस्की, रम या दारूचे व्यसन लागण्याअगोदर तरुण पोरं बनावट फ्रूट बियरपासून सुरुवात करत असल्याचं आता निदर्शनास आलं आहे.

600 बाटल्या जप्त

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी (20 नोव्हेंबर) सकाळी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून 18 हजार रुपये किमतीची फ्रूट बिअर वाहतूक होताना जप्त केली आहे. या कारवाईवेळी अल्ताफ सगरी (वय 32 वर्ष) व गौस अलीशेर बागवान ( वय 31 वर्षं) या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी रिक्षा क्र. MH-13-AN-4898 मधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रूट बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या सहाशे सीलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळून आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ratnagiri : ऐकावं ते नवलंच! व्हेल माशाच्या पिलाचा मानसिक तणावामुळे मृत्यू

बाटल्याची पाहणी केली असता सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोडवरील एका शीतपेयच्या कारखान्यात फ्रूट बियर तयार केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी संबंधित कारखान्याचे सर्व कागदपत्रे तपासून कारखान्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल हा प्रयोगशाळेकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवणार आहेत.

ADVERTISEMENT

‘राज्यभर अशी फ्रूट बियर कुठेही मिळत नाहीत’

राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी माहिती देताना सांगितले की, ‘राज्यातील विविध जिल्ह्यात काम केले परंतु सोलापुरात पहिल्यांदाच बनावट फ्रूट बियरचा धंदा पाहायला मिळाला आहे. फक्त बोली भाषा म्हणून रासायनिक पदार्थांच्या शीतपेयांना सोलापुरात फ्रूट बियर म्हणून संबोधले जात आहे. पण जप्त केलेल्या बाटल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या फळांचा वापर केला नाही. या रासायनिक शीतपेयात जवळपास दोन टक्क्यांच्या वर अल्कोहोल आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Health: ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत अंडी, नाहीतर…

एखाद्या तरुणाने सलग दोन बाटल्या घेतल्या तर जबरदस्त नशा होते. फ्रूट बियरच्या नावाखाली भलताच उद्योग करून सोलापूरच्या तरुणांना व्यसनी केले जात आहे. ही कारवाई निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी व शोएब बेगमपूरे यांच्या पथकाने पार पाडली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील फ्रूट बियरचे बनावट कारखाने उध्वस्त करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT