आप्पासाहेब धर्माधिकारींनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत द्यावा -संभाजी ब्रिगेड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sambhaji Brigade has demanded that Nirupankar Appasaheb Dharmadhikari should return the Maharashtra Bhushan Award.
Sambhaji Brigade has demanded that Nirupankar Appasaheb Dharmadhikari should return the Maharashtra Bhushan Award.
social share
google news

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. या प्रकरणावरून आता संभाजी ब्रिगेडने थेट निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पण, त्यानंतर झालेल्या मृत्यूंमुळे हा संपूर्ण कार्यक्रमच वादात सापडला आहे. यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने मोठी मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडची आप्पासाहेब धर्माधिकारींकडे मागणी काय?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते हर्षल बागल यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे बोलताना महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. “जनरल डायरने ज्या पद्धतीने जालियनवाला बाग हत्याकांड घडवलं होतं, अगदी तसंच हत्याकांड खारघरला महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या अट्टाहासामुळं घडवलेलं आहे”, असा आरोप बागल यांनी केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?

अमित शाहांना खूश करण्यासाठी जमवली गर्दी -संभाजी ब्रिगेड

“आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अमित शाहांना खूश करण्यासाठी खारघरला विनाकारण लाखोंची गर्दी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला अशा बातम्या आल्या. मात्र, आतील माहितीनुसार तिथं चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी व्हायला पाहिजे”, अशी मागणी बागल यांनी केली आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कार परत करावा -हर्षल बागल

संभाजी ब्रिगेडने आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. “आप्पासाहेब धर्माधिकारींनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत द्यायला पाहिजे. राजकीय नैतिकता म्हणून मुख्यमंत्री पदाची गरिमा राखण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते हर्षल बागल यांनी मांडली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

Maharashtra Bhushan : मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची नावे

1) तुळशीराम भाऊ वागड
2) जयश्री जगन्नाथ पाटील
3) महेश नारायण गायकर
4) कलावती सिद्धराम वायचाळ
5) मंजूषा कृष्णा भोंबडे
6) भीमा कृष्णा साळवी
7) सविता संजय पवार
8) स्वप्नील सदाशिव केणी
9) पुष्पा मदन गायकर
10) वंदना जगन्नाथ पाटील
11) मिनाक्षी मोहन मेस्त्री
12) गुलाब बबन पाटील
13) विनायक हळदणकर
14) स्वाती राहुल वैद्य

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT