Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?
gunaratna sadavarte latest news : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केल्यानंतर सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी सदावर्तेंनी फडणवीसांकडे केली आहे.
ADVERTISEMENT
Gunaratna Sadavarte latest news : “एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही. सरकारने जरांगेचे लाड थांबवावेत, नाहीतर मी प्राणांतिक उपोषण करेन”, असा इशारा देत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली. काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंनी यांचा ठपका मनोज जरांगे पाटलांवर ठेवला. (Gunaratna Sadavarte has demanded to Home minister of Maharashtra Devendra Fadnavis that Manoj Jarange, who do hunger strike for Maratha reservation should be arrested.)
ADVERTISEMENT
गुणरत्न सदावर्ते यांनी गाड्यांची तोडफोड केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. “मला हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना प्रश्न विचारायचा आहे की, हीच आहे का तुमच्या शांतता आंदोलनाची व्याख्या? मला शांत केलं जाऊ शकत नाही.”
हे ही वाचा >> Manoj Jarange : “आम्हाला नाटक…”, सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगे संतापले
“मी भारताचा पिल्लर असतं ५० टक्के जागांचं, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात. त्या जागातून वाचवण्यासाठीचा माझा लढा आहे. या देशाला जाती-जातीत न तोलता गुणवत्तेत भर पडावा, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाची आणि घामाची नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी ३२ पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नाहक मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली”, असा दावा सदावर्तेंनी यावेळी केला.
हे वाचलं का?
मुलगी आणि पत्नीला धमक्या
“मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाहीये. झेनला मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. अशा प्रकारचे हल्ले होतील, आघात होईल. ५० टक्के जागा वाचवण्यासाठी आम्हाला त्रास दिला जाईल, असे कॉल, ऑडिओ रेकॉर्डिंग होत्या”, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
हे ही वाचा >> Gadchiroli : 20 दिवस, 5 हत्या! सुनेच्या खुनी खेळाने हादरला महाराष्ट्र, वाचा Inside Story
“मी एकनाथ शिंदेंना भेटलो. त्यांनी सहआयुक्तांना कॉल केला होता. एका कॅबिनेट मंत्र्याने माझ्यासमोर पोलीस उपायुक्त चिमटे यांना कॉल केला. पोलिसांना देखील याची माहिती होती. पोलिसांच्या समोर हल्ला केला. गाड्या फोडल्या. मला पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ते माझ्या घरात येण्याचा प्रयत्न करत होते. गुणवत्ता टिकून राहण्यासाठी माझी हत्या झाली तरी गुणवंतासाठीचा लढा चालू ठेवेन.”
ADVERTISEMENT
जरांगेच्या मुसक्या बांधा… सदावर्ते काय बोलले?
“जरांगे तुम्हाला मी सांगतो… मी श्रद्धेय देवेंद्रजींना मी सांगत आहे. अशा घटनांची श्रृखंला पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झाली, ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. गुन्हेगारी कायद्यातील कलम ७ अन्वये जरांगेला अटक करा. मुसक्या बांधा. कारवाई करा. अन्यथा सामान्यातील सामन्य जो गुणवंत आहे खुल्या वर्गातील… मग तो ब्राह्मण असेल, वाणी असेल… तो इतरातल्या इतर गुणवंतांमध्ये मनात असं येईल की, जात म्हणून एकत्र आलं, तर गुणवत्ता ही तोडमोड केली जाऊ शकते”, असं सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ड्रग्ज प्रकरणावरून पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सुनावलं, म्हणाल्या…
“काल एका चॅनेलने हेही दाखवलं की, माझ्या घराची रेकी केली गेली. हे षडयंत्र आहे. मला सांगायचं की, मी थांबणार नाही. मी सुद्धा महाविद्यालये, विद्यापीठात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि सरकारला सांगेन की, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही. खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी आम्ही लढत आहोत. आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे. जरांगेचा लाड तुम्ही थांबवला नाही, तर मी प्राणांतिक उपोषण करेल. जरांगे पाणी घेऊन उपवास नसतो. सलाईन घेऊन उपवास नसतो. ही आहे का मागासलेपणाची व्याख्या. दादागिरीतील मागासलेपण”, अशी टीका सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT