Video : अटल सेतूवर उतरली अन् उडी मारायला गेली, पण...थरारक व्हिडीओ!
Atal Setu Viral Video : एक महिला कारमधून खाली उतरली आणि तिने समुद्रात उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण कॅब चालकाने (Cab Driver) दाखवलेल्या प्रसंगावधाने तिचा जीव वाचवला (Women Rescue) आहे. या थरारक बचाव कार्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कारमधून उतरली आणि समूद्रात उडी घेतली
कॅब चालकाच्या प्रसंगावधाने वाचला जीव
व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडेल
Atal Setu Viral Video : मुंबईत नुकत्याच बांधलेल्या अटल सेतूवर आत्महत्या करणाऱ्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अशीच घटना शुक्रवारी होता होता राहिली आहे. एक महिला कारमधून खाली उतरली आणि तिने समुद्रात उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण कॅब चालकाने (Cab Driver) दाखवलेल्या प्रसंगावधाने तिचा जीव वाचवला (Women Rescue) आहे. या थरारक बचाव कार्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( atal setu viral video mumbai police rescued a suicide attempting Girl shockinh story from mumbai )
मिळालेल्या माहितीनुसार, मुळची मुलुंडची रहिवाशी असलेल्या रिमा पटेल या 56 वर्षीय महिलेने कॅब बूक केली होती. या कॅबच्या माध्यमातून ती अटल सेतूवर आली होती. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर तिने कॅब चालकाला गाडी रोखण्यास सांगितली आणि ती कारबाहेर पडली.
ADVERTISEMENT
महिला कोणत्यातरी कारणास्तव कारबाहेर पडली असेल असा कॅब चालकाचा कयास होता, त्यामुळे तो कारमध्येच बसून राहिला. मात्र जशी महिला अटल सेतूच्या रेलिंगवर चढली तसा कॅब चालकाचा तिचा उद्देश कळाला आणि त्याने तिच्या बचावासाठी धाव घेतली. सुदैवाने कॅब चालक तिच्याजवळ पोहोचेपर्यंत तिने समुद्रात उडी घेतली नव्हती.
हे ही वाचा : Eknath Shinde: "सावत्र कपटी भावावर..."; लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात CM शिंदेंचं विरोधकांवर शरसंधान
कॅब चालक महिले जवळ पोहोचेपर्यंत महिला रेलिंग क्रॉसकरून समुद्राच्या दिशेने गेली होती. त्याचवेळी कॅब चालक तिच्याजवळ होता. याचवेळी एक न्हावा शेवा वाहतुक पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन अटल सेतूच्या रस्त्यावर गस्त घालत होती. यावेळी गस्ती पथकाने हा सगळा प्रकार पाहताच घटनास्थळी धाव घेतली.
हे वाचलं का?
दरम्यान पोलीस आपल्याला आत्महत्या करण्यापासून रोखतील हे पाहताच तिने समुद्रात उडी टाकण्याचा प्रयत्न केला. पण कॅब चालकाने तिचे केस घट्ट धरले ज्यामुळे तिला समुद्रात उडी घेता आलीच नाही. आणि इतक्यात गस्ती पथकातील पोलिसांनी देखील रेलिंगवर चढून महिलेचे प्राण बचावले. या संपूर्ण बचावाचा थरारक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतोय.
खरं तर एक महिला अटल सेतूच्या रेलिंगवर उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. शेलार टोल नाक्यावर असणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांनी देखील या संदर्भात पोलिस पथकाला माहिती दिली. तसेच कॅब ड्रायव्हर संजय द्वारका यादव यांनी महिलेचे केस धरून वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. तेवढ्यात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले.दरम्यान, ही महिला नैराश्याने त्रस्त होती आणि जीवन संपवण्याच्या उद्देशाने ती पुलावर आली होती. याच घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून त्याचीच चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : फडणवीसांनी सांगितलं फॉर्म रिजेक्ट होण्याचं मोठं कारण
दरम्यान अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्यामुळे अटल सेतू आत्महत्येचे हॉटस्पॉट बनत चाललं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT