Eknath Shinde: "सावत्र कपटी भावावर..."; लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात CM शिंदेंचं विरोधकांवर शरसंधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला समाचार

point

"योजना बंद पाडण्यासाठी कोर्टातही गेले, पण..." शिंदे नेमकं काय म्हणाले?

point

लाडक्या भावांच्या मनात प्रेम होतं का? एकनाथ शिंदेचा विरोधकांना सवाल

CM Eknath Shinde Speech : आम्ही अनेकांना पुरुन उरलो आहोत. नुसता पुरून उरलो नाही. तर सावत्र कपटी भावावर मात करून इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका. फक्त त्यांना लक्षात ठेवा. योग्यवेळी त्यांना योग्य जागा दाखवा. सावत्र भाऊ खोटेनाटे आरोप करत आहेत. ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हा कसा चुनावी जुमला आहे, असंही ते म्हणतात. ही काय भीष देता का? लाच देता का? असंही बोलतात. काहीही बोलायला लागले आहेत. माझ्या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडीतरी जनाची नाहीतर मनाची वाटायला पाहिजे होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला. ते पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वचनपूर्ती सोहळ्यात बोलत होते. (I have come here after overcoming my hypocritical step brother. So don't worry about step brothers. Just remember them. Show them the right place at the right time. The step brother is making false accusations)

ADVERTISEMENT

"योजना बंद पाडण्यासाठी कोर्टातही गेले, पण..."

विरोधकांवर हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले, ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टातही गेले. पण न्यायालयावर आमचा विश्वास होता. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यांनी चांगली चपराक दिली आणि आमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. तुम्ही प्रपंच चालवताना जशी कसरत करता, तशीच कसरत आम्हाला सरकार चालवताना करावी लागते. पुण्यात रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. त्याला आपण कर्ज काढलेलं असतं. त्याचा व्याज भरायचो असतो, पगार असतो. जो खर्च अत्यावश्यक आहे, तो करावाच लागतो.

हे ही वाचा >> "...तर महिलांसोबत उपोषणालाच बसेल...", सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, नेमकं प्रकरण काय? 

लाडक्या भावांच्या मनात प्रेम होतं का? एकनाथ शिंदेचा विरोधकांना सवाल

हे सर्व करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे. म्हणूनच आम्ही लाडक्या बहिणींसाठी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सर्व मंत्रिमंडळाने त्याला साथ दिली. ही घोषणा जाहीर झाल्यानंतर विरोधक म्हणाले, लाडक्या बहिणी आल्या, आता लाडक्या भावांचं काय? कधीतरी त्या लाडक्या भावांच्या मनात प्रेम होतं का? कधीच प्रेम नव्हतं. नाहीतर सोडूनच गेले नसते. सहकारी पण गेले. लाडके भाऊपण गेले. सगळे गेले पण आम्ही ठरवलं, लाडक्या भावालाही योजना दिला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: 'दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन...', ठाकरेंची अदानी-लोढांवर जहरी शब्दात टीका!

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकऱ्यांना शेतीपंप वीज बील माफ केलं. हा देखील आम्ही निर्णय घेतला. वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. महिलांसाठी तोही फायद्याचा ठरणार आहे. परवा रक्षाबंधन आहे. बहिण-भावाचा हा जो उत्सव आहे, हा सण जगात कोणत्याही संस्कृतीत नाही. फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे. आम्ही सर्व भाग्यवान आहोत. प्रत्येकाला भाऊ बहिण असतात. मलाही सख्खी बहिण आहे. पण या लाडक्या बहिणीच्या रुपाने मला तुमच्यासारख्या लाखो बहिणी मिळाल्या. याचा मला आनंद आहे. तुम्हा बहिणींची माया आणि आशीर्वाद प्रेरणा देणारे आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT