Ayodhya Visit: एअरपोर्ट, नवीन रेल्वे स्टेशन… PM मोदी अयोध्येत आणखी कोणते बदल करणार?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Modi Ayodhya Ram Mandir Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवार 30 डिसेंबर रोजी अयोध्या (PM Modi in Ayodhya) दौऱ्यावर येणार आहेत. नवीन वर्षात 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असेल. मात्र त्यापूर्वी आज 30 डिसेंबरला अयोध्या विमानतळाच्या (Ayodhya Airport) उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्या (Ayodhya) शहरात येणार आहेत. विमानतळासोबतच नव्याने बांधलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन होणार आहे. 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करतील. (Ayodhya Visit Airport, new railway station What other changes will PM Modi make in Ayodhya)

PM मोदी उद्घाटनाव्यतिरिक्त ‘या’ कार्यक्रमांमध्ये होणार सहभागी!

विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे (Ayodhya Railway Station) उद्घाटन करण्यासोबतच पंतप्रधान मोदी शहरातील रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत. यासोबतच पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत बांधलेल्या सुमारे 1,450 कोटी रुपयांच्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. विमानतळाचा हा पहिला टप्पा असेल.

वाचा: Rashmi Shukla : मोठी बातमी! रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, कारण…

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन विमानतळावर उद्यापासूनच इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस त्यांच्या फ्लाइट्स सुरू करतील. तसंच, पंतप्रधान उद्या अयोध्येतून अमृत भारत रेल्वेही सुरू करणार आहेत. दोन नवीन अमृत भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याशिवाय सहा नवीन वंदे भारत रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्येत 2,180 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ग्रीनफिल्ड टाउनशिपची पायाभरणी करतील.

वाचा: ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य वास्तववादी’, PM मोदींनी उदाहरणं देऊन स्पष्टच सांगितलं

अयोध्या विमानतळाचे विशेष महत्त्व काय?

मंदिराचे वास्तुविशारद विपुल वार्ष्णेय यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, ‘हे विमानतळ 8000 स्क्वेअर मीटर बिल्ट अप एरियामध्ये बांधण्यात आले आहे. जे नागर शैलीत बांधले आहे. राम मंदिरही नागर शैलीत बांधले जात आहे. विपुल वार्ष्णेय पुढे स्पष्ट करत म्हणाले की, त्यात 7 शिखरे आहेत. समोर तीन शिखरे, मागे तीन आणि मध्यभागी एक शिखर आहे.’

ADVERTISEMENT

‘याशिवाय विमानतळावर ठिकठिकाणी श्री राम दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाहेर धनुष्यबाणाचे मोठे भित्तिचित्र बसवण्यात आले आहे. हे भित्तीचित्र अतिशय विचारपूर्वक बसवण्यात आले आहे. जे पुरूषार्थानेच असत्यावर विजय संभव आहे हे दर्शवते.

ADVERTISEMENT

वाचा: Exclusive Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून निवड

विमानतळाच्या लँडस्केपिंगमध्ये पाच घटक लक्षात घेऊन रंगांचा वापर करण्यात आला आहे. लँडस्केपिंगमध्ये, इमारतीच्या बाहेरील सार्वजनिक क्षेत्रांची रचना नैसर्गिकरित्या केली गेली आहे, ज्यामध्ये जलकुंभ, दगड, फरशा, झाडे आणि वनस्पतींना आकर्षक बनवण्यात आलं आहे.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT