बच्चू कडूंनी थोपटले दंड, भाजप आमदाराचं टेन्शन! साताऱ्यात केली मोठी घोषणा

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

bacchu kadu said prahar janshakti candidates will contest from man khatav constituency
bacchu kadu said prahar janshakti candidates will contest from man khatav constituency
social share
google news

Bacchu Kadu Marathi batmya : प्रहा जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू सध्या महायुतीपासून दूर जात असल्याचे दिसत आहे. मंत्रीपदावर पाणी सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंची नाराजी सातत्याने दिसून येत आहे. आता बच्चू कडूंनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, साताऱ्यात एक मोठी घोषणा केली. बच्चू कडूंच्या घोषणेमुळे भाजप आमदाराचं टेन्शन वाढलं आहे.

ADVERTISEMENT

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोठ्या पक्षांबरोबर छोटे पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले असून, प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दौरे सुरू केले आहेत. बच्चू कडू यांनी महायुतीत १५ जागा दिल्या जाव्या अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अपेक्षित जागा मिळाल्या नाही, तर स्वबळावर लढवू असंही म्हटलेलं आहे. त्यातच आता त्यांनी केलेल्या एका विधानाने साताऱ्यात नवी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा >> “…म्हणून एकनाथ शिंदे मिरच्या झोंबल्याप्रमाणे तडतडताहेत”-उद्धव ठाकरे

आमदार बच्चू कडू हे साताऱ्यातील दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील माण- खटावमध्ये प्रहार संघटना निवडणूक लढणार का, असा प्रश्न साताऱ्यात पत्रकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हा मतदारसंघात प्रहारचा उमेदवार देणार आहोत.”

हे वाचलं का?

बच्चू कडूंचा युतीला राम राम

“आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 टक्के निवडणूक आम्ही लढवणार आहोत. माण खटाव तालुक्यामध्ये सुमारे 28 हजार मतदार हे दिव्यांग आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही”, असे असे बच्चू कडू यांनी ठाम सांगितले.

माण खटावमध्ये भाजप आमदाराला प्रहार देणार आव्हान

भाजप आमदार जयकुमार गोरे हे माण-खटाव मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकदा अपक्ष, तर एकदा काँग्रेसच्या तिकिटावर. त्यांनतर गोरे यांनी 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विजय मिळवला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Ajit Pawar: ‘मी कुणाचीच…’, अजितदादांनी सोडलं मौन, मीरा बोरवणकरांना प्रत्त्युतर

‘मतदारसंघात दिला जाणारा उमेदवार हा सर्वसामान्य जनतेला असून, तो चांगले आव्हान उभे करेल’, असा विश्वास कडूंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे माण- खटावमध्ये २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळू शकते.

ADVERTISEMENT

या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) पक्ष सक्रिय आहेत. त्यात आता माण-खटाव मतदारसंघात प्रहार संघटना उमेदवार देणार असल्याने येथील लढाई अधिक चुरशीची होईल, असं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT