7 खासगी सावकारांकडून पैशांसाठी तगादा, जातीवाचक शब्द; बार्शी नगरपालिकेतील कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं

मुंबई तक

Barshi Crime : 7 खासगी सावकारांकडून पैशांसाठी तगादा, जातीवाचक शब्द; बार्शी नगरपालिकेतील कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं; आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चार चिठ्ठीत सर्व सावकारांच्या नावांचा उल्लेख

ADVERTISEMENT

Barshi Crime
Barshi Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

7 खासगी सावकारांकडून पैशांसाठी तगादा, जातीवाचक शब्द;

point

बार्शी नगरपालिकेतील कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं"

गणेश जाधव, Barshi Crime : बार्शी शहरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. बार्शी नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी गणेश गोविंद बनसोडे (वय 45, रा. म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड, बार्शी) यांनी आर्थिक व मानसिक ताणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर 2025) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी त्यांच्या पत्नी वैशाली गणेश बनसोडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे.

खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं 

फिर्यादी वैशाली बनसोडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, गणेश बनसोडे हे मागील दहा वर्षांपासून बार्शी नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा पगार हा कुटुंबाचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत होता. मात्र, पगार उशिरा मिळणे आणि घरगुती अडचणींमुळे गणेश यांनी एक वर्षांपूर्वी काही परिचित सावकारांकडून व्याजावर पैसे घेतले होते. त्यात निलेश खुडे (रा. सुभाषनगर), प्रशांत माने (रा. बालाजी कॉलनी), विशाल गुगळे (रा. बार्शी), अतुल कांबळे (रा. मंगळवार पेठ झोपडपट्टी), संगिता पवार (रा. ४२२ बार्शी), सचिन सोनवणे (रा. भिमनगर) आणि संतोष नानासाहेब कळमकर (रा. ४२२ बार्शी) या सात जणांचा समावेश आहे.

हेही वाचा : मुलीच्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध, प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला अन् आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, या सर्वांनी गणेश यांना व्याजाचे पैसे फेडण्यासाठी वारंवार धमक्या देत त्यांच्या घरी जाऊन त्रास दिला. विशेष म्हणजे काही सावकारांनी जातीवाचक अपशब्द वापरत “तू आमचे पैसे कसे वापरलेस, तुला हातपाय मोडतो, कामाच्या ठिकाणी गोंधळ घालतो, जातीवाचक शिवीगाळ करत अशी अपमानास्पद भाषा वापरल्याचेही फिर्यादींनी स्पष्ट केले. त्यात संगिता पवार हिने “तू पैसे परत दिले नाहीस तर मी महिलांना घेऊन तुझ्यावर छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करेन” अशी धमकी दिल्याचेही जबाबात नमूद आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp