Eknath Shinde : मोठी बातमी! भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातली बोट बुडाली
Eknath Shinde News : वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याच वेळी हा अपघात घडला आहे.
ADVERTISEMENT
Eknath Shinde Bhandara Tour : भंडाऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात जलपर्यटनाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) ताफ्यासोबत जाणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीत सगळे मीडियाकर्मी बसले होते. मात्र अचानक ही बोट तुटली आणि नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अद्यापतरी कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र या घटनेने खळबळ माजली आहे. (bhandara news cm eknath shinde convay boat sank in river shocking story)
ADVERTISEMENT
जलपर्यटनाला चालना देण्यासाठी वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या दरम्यानच ही अपघाताची घटना घडली आहे.
हे ही वाचा : शिवसेना शिंदे गटात राजकीय पिंगा, माजी नगरसेवक म्हणाले मलाच...
जल पर्यंटनाच्या पहिल्या टप्प्याचे भुमिपूजन करण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे भंडाऱ्यात आले होते. या भुमिपुजनाला वैनगंगा नदीतून जात असताना, मुख्यमंत्र्यांसोबत मीडियाची एक बोट होती. ही बोट नदीत मध्येच एका खडकावर आदळल्यामुळे मोठा अपघात झाला. या घटनेत बोटीचे तीन तुकडे झाले आणि ती पाण्यात बुडाली होती. सुदैवाने या अपघातात कोणताही जिवितहानी झाली नाही.
हे वाचलं का?
वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. येथील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार असून भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, मतांचा कोटा ठरवणार जागा कोणाची?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या स्वागताचे भंडारा जिल्ह्यात जागोजागी होर्डिंग लावण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने रोजगारात वाढ होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT