Bullock Cart: भारत केसरी स्पर्धेचा हिरो ठरला कल्याणचा मथूर बैल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

child marriage beed bjp girls parents police crime bride groom family
child marriage beed bjp girls parents police crime bride groom family
social share
google news

कल्याण: महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांपासून एक नंबर वर असलेल्या मथूरने भव्य दिव्य भारत केसरी स्पर्धेत बाजी मारली आहे. बऱ्याच महिन्यांपासून भारत केसरी बैलगाडा शर्यत होणार या चर्चेत असणाऱ्या वडकी गावात भारत केसरी स्पर्धेचा काल ग्रँड फिनाले पार पडला आणि या फायनलमध्ये कल्याणच्या मथूर नावाच्या बैलाने बाजी मारली आणि भारत केसरी बनला. (bharat kesari competition bullock cart race bull mathur kalyan won grand finale)

ADVERTISEMENT

कल्याणच्या मथूरचा महाराष्ट्रभर चर्चा

पुण्यातील वडकी गावात भारत केसरी स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला, यामध्ये मथुरने शेवटपर्यंत हार न मानता मालकाचाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज जिंकलं आहे. टॉपच्या बैलांना मात देत राहुल पाटील यांच्या मथूरने आज पण आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बैलांना मात देण्याची किमया मथूरने केली आहे. बैलगाडा शर्यतीत प्रमुख नाव म्हणून राहुल पाटील यांची ओळख आहे. मथुरच्या यशामुळे कल्याणात बैलगाडा शर्यत प्रेमींनी सोशल मीडियावर मथुरचे फोटो व्हिडीओ शेयर केले आहेत.

हे ही वाचा>> BEED: लग्नाची सुपारी आचारी, मंडपवाल्याला चांगलीच भोवली; पैसे तर मिळालेच नाही पण..

नाद केला पण वाया नाही गेला, महाराष्ट्राचा एकच किंग, असे एक ना अनेक स्टेटस ठेवत सध्या मथूर बैलाचं खूप कौतुक होताना दिसतंय. बैलगाडा शर्यतींचा नाद खुळा अस म्हणत ठाणे जिल्ह्यातही अनेक बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहे, पण अलीकडे फक्त एकाच नावाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे मथूर बैल.. महाराष्ट्राचा किंग म्हणून मथूरला ओळख मिळत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> सुसंस्कृत पुणे हादरलं, अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बायकोने पतीचा घरातच काढला काटा

बैलगाडा शर्यतीतील आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे पनवेलचे पंढरीनाथ फडके, फडकेंच्या बादल बैलावरही पाटलांचा मथूर भारी पडला होता, त्यामुळे फडके आणि पाटील गट चर्चेत आले. मथूरमुळे फडकेंच्या ब्रँड इमेजला एका बैलगाडा स्पर्धेत धक्का पोहचला होता, त्यामुळे कल्याणचे राहुल पाटील आणि त्यांचा मथूर अधिक चर्चेत आले. तसेच पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यात मोठा वाद निर्माण झाले असून एकमेकांवर गोळीबार करण्यात आली होती. आता भारत केसरी स्पर्धा जिंकल्यामुळे मथूर बैल एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT