पतीला झाडूने झोडलेलं? पत्नीबाबत Bombay High Court चा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

case of beating husband with broom know what decision bombay high court took regarding wife
case of beating husband with broom know what decision bombay high court took regarding wife
social share
google news

Bombay High Court Husband-Wife Case: मुंबई: भांडणाच्या वेळी पतीला झाडूने मारहाण करणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला आहे. कारण या प्रकरणात आता न्यायालयाने पत्नीविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र रद्द केले आहे. सुरुवातीला भांडणाच्या वेळी पत्नीने पतीला चावा घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर पतीने पत्नीला कानशिलात लगावली होती. अखेर पत्नीच्या गैरवर्तनाला कंटाळून पतीने एप्रिल 2022 मध्ये सायन पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. पण आता या प्रकरणी वेगळीच माहिती समोर आली आहे. (case of beating husband with broom know what decision bombay high court took regarding wife)

ADVERTISEMENT

न्यायमूर्ती पीडी नाईक आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर पत्नीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर खंडपीठाने आरोपपत्रावर विचार केल्यानंतर सांगितले की, एफआयआरमध्ये नमूद केलेल्या गोष्टींवरून पती-पत्नीमधील संबंध ताणले गेले होते. प्रकरणातील तथ्यं कलम 324 अंतर्गत गुन्ह्याच्या घटकांची अनुपस्थिती दर्शवतात. तक्रारदाराने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात पतीला गंभीर दुखापत झाल्याचे सूचित केले आहे, परंतु पोलीस अहवालात असे सूचित होत नाही.

पतीने स्वत:ला दुखापत केल्याची शक्यता अहवालात दर्शवली आहे. या खटल्यातील साक्षीदारांचे जबाब तक्रारदाराच्या आरोपांना समर्थन देत नाहीत. आरोपपत्रात पत्नीविरुद्ध (अर्जदार) कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> अर्ध्या रात्री रिक्षाचालकाने मुलीच्या स्कर्टमध्येच घातला हात, अन्…

दरम्यान, या प्रकरणातील याचिकाकर्त्या पतीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे पत्नीविरुद्ध खटल्याशी संबंधित कार्यवाही सुरू ठेवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे म्हणून या प्रकरणातील आरोपपत्र आता रद्द करण्यात आले आहे.

‘स्वतःला इजा पोहचवली असण्याची शक्यता’

पोलिसांनी पत्नीविरुद्ध कलम 324, 427, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासाअंती पत्नीविरुद्ध कुर्ला दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, तर या प्रकरणी पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ती रद्द करण्याची मागणी केली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Crime: उधारीमुळे कान गमावला, मित्राने तोडला कानाचा लचका!

याचिकेत महिलेने दावा केला होता की, आता तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. आरोपपत्रात समाविष्ट असलेल्या सामग्रीवरून एफआयआरमध्ये नमूद केलेल्या कलमांखाली गुन्हा उघड होत नाही. पोलिसांनी सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात पतीने स्वत:ला दुखावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

याचिकेनुसार पती पत्नीला मारहाण करायचा. एफआयआरमध्ये अनेक पैलूंवर भाष्य करण्यात आलेलं नाही. म्हणूनच हायकोर्टाने आरोपपत्र रद्द करत हे प्रकरण निकालात काढलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT