Chandrapur : भाजप नेत्यासह तिघांचा मृत्यू, अस्थिविर्सजन करतानाच काळाने घातली झडप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrapur shocking news three people drowned in wardha river bjp leader and two boy dead durning asthi visarjan
chandrapur shocking news three people drowned in wardha river bjp leader and two boy dead durning asthi visarjan
social share
google news

Chandrapur News : चंद्रपुर (Chandrapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अस्थिविर्सजनासाठी गेलेल्या तिघांचा नदीपात्रात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाजप नेते (Bjp Leader) गोविंदा पांडुरंग पोडे (47), त्यांचा एकूलता एक मुलगा चेतन गोविंदा पोडे (16) आणि पुतण्या गणेश रवींद्र उपरे (17) अशी या बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. नांदगावजवळ वर्धा ईराई  (Wardha River) नदीच्या संगमाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. (chandrapur shocking news three people drowned in wardha river bjp leader and two boy dead durning asthi visarjan)

ADVERTISEMENT

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष आणि नांदगावचे भाजप नेते गोविंदा पोडे यांचे वडील घनश्याम जित्राजी पोडे यांचे 11 नोव्हेंबरला निधन झाले होते. या निधनानंतर त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी रविवारी 19 नोव्हेंबरला पोडे कुंटुंबिय वर्धा ईराई नदीच्या संगमावर दाखल झाले होते. यावेळी पुजा केल्यानंतर लगेच अस्थिविसर्जन करण्यात आले.

हे ही वाचा : Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं

अस्थिविसर्जनानंतर गोविंदा पोडे यांचा मुलगा आणि पुतण्या नदीपात्रात पोहोण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक बुडू लागले होते. त्यांना वाचवण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदीत उडी मारली, मात्र दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा देखील बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेदरम्यान घटनास्थळी कुटुंबातील 30 सदस्य उपस्थित होते. मात्र कुणीही काहीच करू शकले नाही आणि तिघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत भाजप नेते गोविंदा पांडुरंग पोडे (47), त्यांचा मुलगा चेतन गोविंदा पोडे (16) आणि पुतण्या गणेश रवींद्र उपरे (17) यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

हे वाचलं का?

दरम्यान ही घटना दुपारी 4 च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर स्थानिक पोलीस, पोलीस बचाव पथक आणि स्थानिक मच्छिमार घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी या बचाव पथकांनी शोध मोहिम राबवून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. मुलगा चेतन पोडे आणि पुतण्या गणेश उपरे यांचे मृतदेह सापडले आहेत तर गोविंदा पोडे यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.मृत गोविंदा पोडे हे भाजपचे मोठे नेते आहेत. तसेच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे गोविंदा पोडे यांच्या निधनानंतर भाजप कार्यकर्त्याकडूनही शोक व्यक्त होत आहे. तसेच वर्धा नदीत कुटुंबातील तीन जण वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : INDvsAUS World Cup 2023 Final: भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा, हाता-तोंडाशी आलेलं विश्वविजेतेपद कांगारूंनी हिसकावलं!

शोध मोहिम राबवतानास गोविंदा पोडे यांचा मुलगा व पुतण्याचे मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. पण शोध मोहिमे दरम्यान अंधार झाल्याने गोविंदा पोडे यांचा मृतदेह बाहेर काढता आला नाही.रात्रीही पोलिस विभागाकडून शोधमोहीम अविरतपणे सुरू आहे. बचाव पथक तिसऱ्या मृतदेहाच्या शोध घेत आहे, असे चंद्रपुरचे पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेसी यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT