जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? बावनकुळे म्हणाले, "काही नेते तयारीत, पण..."

योगेश पांडे

ADVERTISEMENT

जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर बावनकुळेंनी काय दिलं उत्तर?
is jayant patil joining bjp
social share
google news

Chandrashekhar Bawankule Jayant Patil : शरद पवारांच्या जवळचे नेते जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का? याबद्दल माध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सूचक विधान केले. 

नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. भविष्यात माझा आणि विजय वडेट्टीवार यांचा बॉस एकच असेल, असं नितेश राणे म्हणालेले. त्याबद्दल माध्यमांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला. बावनकुळे म्हणाले, "नितेश राणेंनी काय ट्विट केलं, याबद्दल मी बोलणं योग्य नाही, पण अजूनही काही कुठेही विजय वडेट्टीवार किंवा जयंत पाटील यांच्याबद्दल पक्षात संपर्क नाहीये."

काहीच सांगता येत नाही -बावनकुळे

बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, "पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही. रोज राजकारण बदलत असतं. रोज विचार बदलत असतात लोकांचे. त्यामुळे मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आणि आमच्या विचारधारेवर कुणी काम करायला तयार असेल, तर आमच्याकडे स्वागत आहे." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयंत पाटलांबद्दल बावनकुळेंनी काय सांगितलं?

भाजप पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर बावनकुळे म्हणाले की, "मोदीजींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक सोबत येण्याच्या तयारीत आहे. काही तयारी करत आहेत. तुमच्याकडे जी माहिती आहे, ती माझ्याकडे नाही. पण, कधीही काही होऊ शकतं."

हा प्रश्न जयंत पाटलांबद्दल होता, असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा विचारलं. त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, "जयंत पाटील यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा नाही. त्यांनी पक्षात येण्यासाठी कुणाशी संपर्क केलेला नाही. माझ्याशीही बोलले नाहीत."

ADVERTISEMENT

"मला वाटत की काही कपोलकल्पित बातम्या असतील. पण, तरीही मोदीजींना साथ देण्यासाठी कुणी भाजपमध्ये येत असेल, तर आमचा दुपट्टा तयार आहे. आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे. आमच्या स्पेस आहे. आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही", असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

ADVERTISEMENT

"कुणाचीही विश्वासार्हता धोक्यात येईल, असं मी बोलणार नाही. जयंत पाटील वरिष्ठ नेते आहेत. ते कुणाच्या संपर्कात आहेत, मला माहिती नाही. पण, माझ्या संपर्कात तर ते कधीही नाही", असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

जयंत पाटील काय बोलले आहेत?

भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंध आहे. शरद पवारांच्या जवळचा बडा नेता म्हणून येणाऱ्या बातम्या केवळ अफवाच आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे", असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT