Chandrayaan-3 Moon Landing Live Update: भारताने इतिहास रचला, INDIA चंद्रावर पोहचलं… विक्रमचं यशस्वी लँडिंग
Chandrayaan 3 Landing Live Streaming Platforms: चांद्रयान 3 चं विक्रम लँडरचं लँडिंग होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. अशावेळी आपल्याला मुंबई Tak च्या फेसबुक, युट्यूब तसेच वेबसाइटवर लाइव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 landing live update: भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) नं चंद्राच्या दिशेने धाडलेलं चांद्रयान – 3 (Chandrayaan 3) हे आज म्हणजेच 23 ऑगस्ट, 2023 रोजी चंद्राच्या (Moon) दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास या चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगला सुरुवात होणार आहे. त्यावेळी हे सॉफ्ट लँडिंग आपण मुंबई Tak च्या यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर चॅनेलवरून ऑनलाइन पाहू शकता. तसेच मुंबई Tak च्या वेबसाइटवर देखील तुम्हाला याबाबतचे सगळे लाइव्ह अपडेट पाहता येणार आहे. (chandrayaan 3 landing live vikram moon soft landing update isro live Streaming)
ADVERTISEMENT
कुठे कुठे पाहा Chandrayaan 3 Landing LIVE
Chandrayaan 3 Landing LIVE पाहण्यासाठी मुंबई Tak YouTube इथे क्लिक करा..
Chandrayaan 3 Landing LIVE पाहण्यासाठी मुंबई Tak Website इथे क्लिक करा..
हे वाचलं का?
Chandrayaan 3 Landing LIVE पाहण्यासाठी मुंबई Tak Facebook इथे क्लिक करा..
Chandrayaan 3 Landing LIVE पाहण्यासाठी मुंबई Tak Twitter इथे क्लिक करा..
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 Landing Live Update:
- भारताने इतिहास रचला, भारताच्या विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या झालं पूर्ण
- पंतप्रधान मोदी द. आफ्रिकेतून VC च्या माध्यमातून लँडिंग प्रक्रिया पाहत आहेत.
- विक्रम लँडर आता चंद्रापासून फक्त 5 किमी दूर
- विक्रम लँडरने लँडिंगची जवळजवळ 75 ते 80 टक्के प्रक्रिया पूर्ण केली
- विक्रम लँडर आता चंद्रापासून फक्त 22 किमी दूर
- विक्रम लँडरच्या लँडिंगला सुरुवात झाली
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचं लँडिंग होणार
- रफ ब्राकिंग फेजला यशस्वीरित्या सुरुवात झाली
- 5 वाजून 44 मिनिटापासून विक्रम लँडरच्या लँडिंगची सुरुवात झाली
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 : हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्च…, चांद्रयान 3 चे बजेट किती?
Chandrayaan 3 Moon Landing : इस्त्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनटानीचांद्रयान 3 चंद्राच्या पुष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश असणार आहे. अशात एकीकडे इस्त्रोच्या या मोहिमेची चर्चा सूरू असताना दुसरीकडे चंद्रयानच्या बजेटची चर्चा रंगली आहे. त्यामुळे चंद्रयान 3 चे नेमके बजेट किती आहे? व या बजेटची जगभरात चर्चा होण्यामागचे कारण काय आहे हे जाणून घेऊयात.
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्वीट रिट्वीट केले होते. या रिट्वीटनंतर चंद्रयान 3 च्या बजेटची चर्चा सुरु झाली होती. खरं तर झालं असं की, सिंडा पोम नावाच्या एका पत्रकाराने चंद्रयानच्या बजेटबाबत एक ट्वीट केले होते. या ट्विटमध्ये सिंडा पोम यांनी चांद्रयान 3 चे बजेट 75 मिलियन ड़ॉलर आणि इंटरस्टेलर सिनेमाचे बजेट 165 मिलियन ड़ॉलर असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला होता. पोम यांचे म्हणणे होते की, हॉलिवूड सिनेमा इंटरस्टेलर सिनेमाच्या बजेटपेक्षाही कमी किमतीत भारत चंद्रावर पोहोचतोय, असे त्यांचे म्हणणे होते. हेच ट्विट एलन मस्कने रिट्वीट करत भारतासाठी चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
एकूणच काय तर हॉलिवूडचा इंटरस्टेलर सिनेमा 165 मिलियन डॉलरमध्ये बनवला गेला होता. या हॉलिवूड सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी किमती भारताने चंद्रयान 3 ची मोहिम आखली आहे. भारत 75 मिलियन डॉलरमध्ये चंद्रावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे भारताचे हे बजेट अमेरीका, रशिया आणि चीनच्या बजेटपेक्षा खूपच कमी आहे.
भारताचे बजेट किती?
मीडिया रिपोर्टनुसार, भारताच्या चंद्रयान 3 चे बजेट हे 615 करोड रूपये आहे. इस्त्रोने या मोहिमेचा अंदाजित खर्च 600 करोड रूपये ठेवला होता. पण चंद्रयान 3 पूर्ण बनवण्यात 615 करोड खर्च झाले होते. चंद्रयान 2 चे बजेट तर यापेक्षा अधिक आहे. इस्त्रोच्या चंद्रयान 2 चे बजेट 978 करोड रूपये होते. अमेरीकेसारख्या शक्तिशाली देशाचे मुन मिशन 825 लाख करोड रूपयांचे होते. या तुलनेत चंद्रयान 3 चे बजेट खुपच कमी आहे. त्यामुळे बजेट कमी असून सुद्धा चंद्रयान 3 चंद्रावर पाऊल ठेवते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Chandrayaan-3 Landing time : चंद्रावर यशस्वी लँडिंगसाठी ‘कासव’चाल
चांद्रयान-3 ताशी 40 हजार किलोमीटर वेगाने अंतराळात धावत होते. आता ते कासवाच्या वेगापेक्षा कमी वेगाने लँडिंग करेल. कासव सरासरी 4 ते 5 मीटर प्रति सेकंद या वेगाने पोहतो. 1 ते 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने जमिनीवर चालतो. कासवांची नवीन पिल्ले 40 किलोमीटरचा प्रवास 30 तासांत पूर्ण करतात. मादी कासव त्यांच्या मुलांपेक्षा किंवा नर कासवांपेक्षा वेगाने पोहतात किंवा धावतात. जेणेकरून ते आपल्या मुलांना भक्षकांपासून वाचवू शकतील. चांद्रयान-3 चे लँडिंग 1 ते 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने होईल. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा
Chandrayaan-3 Landing in Evening: चांद्रयान-3 चे लँडिंग तिन्ही सांजेलाच का, अंधारात उतरणार विक्रम?
Chandrayaan-3 Live: चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3)लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान कधीही चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरू शकते. तशी याची नेमकी वेळ ही संध्याकाळी 06:04 वाजेची आहे. चाँद्रयानाचं लँडर हे पूर्णपणे स्वयंचलित आहे. त्यामुळे लँडिंगची जागा तो स्वतःच शोधल आणि योग्य ठिकाणी उतरेल. (why isro is getting chandrayaan 3 landing in the evening will it land on the lunar surface in the dark live update)
मात्र असं असताना इस्रो (Isro) ने संध्याकाळीच लँडिंग करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेव्हा अंधारात चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचं लँडिंग का केलं जात आहे. पण याचं कारण म्हणजे जेव्हा विक्रम लँडरचं (Vikram Lander) लँडिंग होईल तेव्हा पृथ्वीवर भारतात संध्याकाळ असेल पण त्यावेळी चंद्राच्या त्या भूभागावर सूर्योदय होत असेल. म्हणून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी ही वेळ निवडली आहे.
ISRO चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले की, ज्या वेळी आपण विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवत आहोत. त्यावेळी भारतासह अनेक देशांमध्ये संध्याकाळ असेल पण त्याचवेळी सूर्य मात्र चंद्रावर उगवला असेल. लँडिंगची ही वेळ यासाठी निश्चित केली आहे की, जेणेकरून लँडरला 14 ते 15 दिवस सूर्यप्रकाश मिळावा यासाठी हे केले जात आहे. जेणेकरून त्याला सर्व वैज्ञानिक प्रयोग व्यवस्थित करता येतील.
विक्रम लँडर-प्रज्ञान रोव्हर हे सूर्यप्रकाशावर चालणार
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते सूर्यप्रकाशातील ऊर्जा घेऊन चंद्रावर एक दिवस घालवू शकतात. चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. म्हणजेच 14 दिवस संपल्यानंतर हे लँडर आणि रोव्हर काम करणार नाही असं म्हणता येणार नाही. कारण ज्या भागत लँडर आणि रोव्हर असेल तिथे जेव्हा पुन्हा सूर्य उगवेल तेव्हा हे दोन्ही पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
चंद्रावर सूर्यास्त झाल्यावर लँडर आणि रोव्हरला ऊर्जा मिळणार नाही. त्यामुळे ते काम करणं बंद करतील. इस्रोच्या चाचण्यांवरून असे दिसून आले आहे की लँडर आणि रोव्हरच्या बॅटरीमध्ये चार्ज होण्याची आणि सूर्य पुन्हा उगवल्यावर काम करण्यास पुरेशी शक्ती आहे. हे पुढील 14 दिवसांत किंवा आणखी काही वेळात शक्य आहे.
लँडर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर येईल बाहेर
सध्या चांद्रयान-3 ची हे सुस्थितीत आहे. लँडिंगची तारीख 23 ऑगस्ट आहे. चांद्रयान-2 च्या लँडरच्या अयशस्वी लँडिंगच्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच हा मोठा प्रयत्न पुन्हा एकदा केला जात आहे. एका विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रमच्या आतील दरवाजा उघडेल. त्यानंतर त्यातून प्रज्ञान रोव्हर आतून बाहेर येईल आणि त्याचे पुढील प्रयोग पूर्ण करेल.
प्रज्ञान रोव्हरवर कॅमेरे आणि अडथळे टाळण्यासाठी एक यंत्रणा सज्ज आहे. प्रज्ञान रोव्हर फक्त विक्रम लँडरच्या आसपासच काम करेल. ते फार दूर जाऊ शकत नाही. विक्रम लँडर त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करू शकेल इतकेच ते पुढे जाऊ शकते. कारण लँडरला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल.
चांद्रयान-3 च्या लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोने दोन माध्यमांचा अवलंब केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे यावेळी चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आलेले नाही. त्याच्या जागी प्रोपल्शन मॉड्यूल (Propulsion Module)पाठवण्यात आले आहे. ज्याचा उद्देश फक्त चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलला (Lander Module) चंद्राच्या जवळ आणण्याचा होता. याशिवाय, लँडर आणि बंगळुरूमध्ये स्थित इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) यांच्यात संपर्क स्थापित केला जाणार होता.
मोठी बातमी: …तर चांद्रयानाचं लँडिंग 23 ऑगस्ट नाही तर ‘या’ दिवशी होणार!
Chandrayaan 3 Moon landing: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या चांद्रयान मोहिम यशस्वी होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत.येत्या 23 ऑगस्टच्या सांयकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे.असे असतानाच आता चांद्रयानच्या लँडिंगवरून इस्त्रोच्या (ISRO) वैज्ञानिकांनी मोठी माहिती दिली आहे.
चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) लँडिंगच्या 2 तासाआधी इस्त्रोचे वैज्ञानिक चंद्रावरील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.चंद्रावरील परिस्थिती जाणून घेतल्यानंतरच चांद्रयान 3 च्या लँडिंगबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे अहमदाबादचे संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे.देसाई पुढे म्हणाले की,जर आम्हाला वाटले की चंद्रावर लँडिंग करण्याची स्थिती चांगली नाही आहे,तर आम्ही चांद्रयानची लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू.पण तरीही 23 ऑगस्टला चांद्रयानला लँड करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा विश्वास देखील निलेश देसाई यांनी व्यक्त केला आहे.
इस्त्रोने वैज्ञानिक निलेश देसाई यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी हा खुलासा केला आहे. 23 ऑगस्टला 30 किलोमीटरच्या उंचीवरून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर 1.68 प्रति सेकंद वेगाने उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी लँडर माड्यूलची टेस्ट केली जाणार आहे, तसेच चंद्रावरील परिस्थितीचाही देखील आढावा घेतला जाणार आहे.या सर्व गोष्टी केल्यानंतर साधारण 2 तासांनी चांद्रयानचे लँडिंग करायचे की नाही,याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान मला असे वाटतं नाही की अशी कोणतीही तांत्रिक संमस्या येणार आहे.पण जर आली तर आम्ही लँडिंग पुढे ढकलून 27 ऑगस्टला करू.यासाठीची आम्ही संपूर्ण तयारी देखील केली आहे, असे निलेश देसाई यांनी म्हटले आहे.
23 ऑगस्टला 30 किलोमीटरच्या उंचीवरून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर 1.68 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. ही खूप गती आहे.यावेळी चंद्राचे गुरूत्वाकर्षण त्याला खालच्या दिशेने खेचणार आहे.अशावेळेस आम्ही थ्रस्टर इंजिनने रेट्रो फायर करणार आहोत. जेणेकरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लँडरची गती कमी केली जाईल. आणि हळूहळू चंद्राच्या पुष्ठभागावर पोहोचल्यावर त्याची गती शून्य होणार आहे. यासाठी आम्ही लँडर माड्यूलवर चार थ्रस्ट फायर लावले आहेत. या थ्रस्ट फायरद्वारे लँडरची गती कमी केली जाणार आहे, असे निलेश देसाई यांनी सांगितले आहे.
Chandrayaan 3 : चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार, तेव्हा PM मोदी कुठे असणार?
Chandrayaan 3 Moon Landing: 23 ऑगस्ट 2023 च्या संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. अशाप्रकारे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश ठरणार आहे.या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे.देशाच्या या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके कुठे असणार आहेत? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण चांद्रयान 2 मोहिमे दरम्यान पंतप्रधान मोदी वैज्ञानिकांसोबत इस्त्रोच्या बंगळुरुतील कार्यालयात उपस्थित होते. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित होतोय.
भारताने चांद्रयान 2 मोहिम 22 जुलै 2019 ला आखली होती. त्यानुसार 7 सप्टेंबरला हे य़ान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते.यासंबंधीत संपूर्ण तयारी देखील झाली होती. या ऐतिहासिक क्षणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार ठरण्यासाठी बंगळूरूतील इस्त्रोच्या कार्यालयात उपस्थित होते.मात्र चांद्रयानला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करवणारा लँडर विक्रम 7 सप्टेंबरला सॉफ्ट लँडिंग करण्यास असफल ठरला होता.त्यामुळे अंतिम टप्प्यात येऊन चांद्रयान 2 मोहिम अपयशी ठरली होती.
भारताची चांद्रयान 2 मोहिम अपयशी ठरल्यानंतर इस्त्रोचे चीफ के सीवन यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीवन यांची गळाभेट घेऊन त्यांना धीर दिला होता. यासंबधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यामुळे चांद्रयान 3 लँडिंग दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे असणार आहेत? ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार का असा सवाल उपस्थित होते.
कुठे असणार मोदी?
चांद्रयान 3 च्या लँडिंग दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताबाहेर असणार आहेत. त्याचं झालं असं की, पंतप्रधान मोदी उद्या 22 ऑगस्ट मंगळवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मोदी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.तसेच बुधवारी पंतप्रधान मोदी ब्रिक्सच्या एका कार्यक्रमात सहभागी होतील.
पंतप्रधानांना बुधवारी दुपारी 2 वाजता परराष्ट्र सचिवांकडून ब्रिफिंग दिली जाईल. असे साधारण 24 ऑगस्टपर्यंत पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत असतील त्यानंतर ते मिस्त्रसाठी रवाना होणार आहेत.त्यामुळे यंदाच्या वेळस वैज्ञानिकांसोबत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरण्यासाठी पंतप्रधान मोदी नसणार आहेत.
Welcome Buddy… चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान-3 च्या लँडरचे केले स्वागत, चंद्रावर जोडला गेला संपर्क
चंद्र पृथ्वीपासून तब्बल 3.84 लाख किलोमीटर दूर आहे. एवढ्या दुरून संपर्क राखणे हे सोपे काम नाही. तेही दुहेरी. म्हणजे दुतर्फा संवाद. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून आता केवळ 24 किलोमीटरच्या उंचीवर आहे. दोन दिवसांनी त्याला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायचे आहे. अशा परिस्थितीत लँडर-रोव्हरशी संपर्क राखणे हे मोठे आव्हान आहे.
चांद्रयान-3 च्या लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोने दोन माध्यमांचा अवलंब केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे यावेळी चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आलेले नाही. त्याच्या जागी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवण्यात आले आहे. ज्याचा उद्देश फक्त चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलला चंद्राच्याजवळ आणण्याचा होता. याशिवाय, लँडर आणि बंगळुरूमध्ये स्थित इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) यांच्यात संपर्क स्थापित करणं हा उद्देश आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी इस्रोने स्वतंत्र तयारी केली होती. हा एक बॅकअप प्लॅन आहे. ज्यामध्ये चांद्रयान-3 चे लँडर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरशी जोडले जाणार होते. जेणेकरून कोणतीही अडचण आल्यास चंद्राभोवती फिरणाऱ्या जुन्या ऑर्बिटरद्वारे संपर्क प्रस्थापित करता येईल. आता इंडियन डीप स्पेस नेटवर्क सेंटर आणि टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क हे दोन प्रकारे विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करू शकतील.
चंद्रावरील लँडरशी पृथ्वीचा संपर्क कसा होईल?
प्रोपल्शन मॉड्युलमध्ये एस-बँड ट्रान्सपॉन्डर बसवलेला आहे, जो IDSN च्या थेट संपर्कात असेल. म्हणजेच लँडर-रोव्हरकडून मिळालेला संदेश भारतात पोहोचेल. संदेश पाठवण्याची प्रक्रिया अशी असेल:
– रोव्हर जे काही पाहील, ते लँडरला संदेश देईल.
– लँडर तो संदेश थेट IDSN किंवा प्रोपल्शन मॉड्यूलला पाठवेल.
प्रोपल्शन मॉड्यूलमधील एस-बँड ट्रान्सपॉन्डरद्वारे, कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात स्थित ब्यालालू इंडियन डीप स्पेस नेटवर्कशी संपर्क साधेल.
– IDSN मध्ये चार मोठे अँटेना आहेत. 32 मीटर खोल स्पेस ट्रॅकिंग अँटेना, 18 मीटर खोल स्पेस ट्रॅकिंग अँटेना आणि 11 मीटर टर्मिनल ट्रॅकिंग अँटेना. त्यांच्यामार्फत संदेश प्राप्त होईल.
-प्रोपल्शन मॉड्युलद्वारे संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही, तर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरची मदत घेतली जाईल. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत बॅकअप राहील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT