Chhagan Bhujbal : 'भानगडी करून काय फायदा?', भुजबळांचा जरांगेंना खोचक सवाल
Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil : मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनोज जरांगेंच्या उपोषणावर टीका

छगन भुजबळांनी शिव्यांच्या मुद्द्यावर केली टीका

ओबीसी आरक्षण देण्यास विरोध
Chhagan Bhujbal Manoj Jarange : सात मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. दरम्यान, त्यांच्या उपोषणाबद्दल वेगळीच शंका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "जर सगळं झालं, तर परत उपोषण करायचं कारण काय? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. पाठीमागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेची व्याप्ती वाढवू नका. याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे."
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारलं -भुजबळ
मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ म्हणाले की,"वेगळं आरक्षण द्यायला विरोध नाही. उलट द्या असंच आमचं म्हणणं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्य असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला... म्हणजे राणे समिती, पण तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन उच्च न्यायालयात टिकला, पण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी सुक्रे आयोग त्यांनी नेमला. आयोग कसा वादग्रस्त झाला, ते वेगळं. जुन्या लोकांनी राजीनामे दिले आणि यांनी नवीन लोक नेमले", असे त्यांनी सांगितलं.
जरांगेंच्या उपोषणाबद्दल भुजबळ काय बोलले?
"क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत. सुक्रे आयोग आणि न्यायमूर्ती हे मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल आणि ते कसं टिकेल. याला आमचा पाठिंबा आहेच. ते 15 तारखेला येईल असं वाटलं होतं", असं सांगत असताना भुजबळांनी जरांगेंच्या उपोषणावर भाष्य केलं. "कदाचित जरांगेंना वाटलं असेल, 15 तारखेला येणारच आहे आणि मराठा आरक्षण मिळणारच त्यामुळे आपण 10 तारखेलाच उपोषणाला बसावं. म्हणजे मग श्रेय सुद्धा मिळू शकतं. त्यांची समज काही चुकीची नाहीये", अशी भूमिका भुजबळांनी मांडली.