मुंबई हादरली! वरळी समुद्रकिनारी गोणीत सापडला तरूणीचा मृतदेह

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Murder Case : मुंबईतील प्रसिद्ध वरळी परिसरात एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. समुद्रकिनाऱ्यावर हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या तरूणीचे हात-पाय तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणीचा मृतदेह आढळताच वरळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. (Dead body of a young woman was found in a sack at Worli beach in Mumbai)

अशा परिस्थितीत आता ही मुलगी कोण आहे? ती मुंबईची आहे की, मुंबईबाहेरून आली आहे याची माहिती पोलीस घेत आहेत. या मुलीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत.यावेळी हात-पाय तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने वरळी परिसरात खळबळ उडाली आहे. या आणखी एका घटनेमुळे मुंबईत मुली सुरक्षित नसल्याचे वारंवार समोर येत आहे.

Maharashtra Politics : बंडानंतर छगन भुजबळांचा शरद पवार, जयंत पाटलांवर घणाघात

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी सी फेसवर गोणीत आढळलेला तरूणीच्या मृतदेहानंतर तपास सुरू आहे. या तरुणीचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांचं पारडं जड की, अजित पवाराचं; कुणाकडे किती आमदार? नावं आली समोर

काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग करण्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता मुलीचा मृतदेह सापडला आहे.अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT