Nilesh Lanke: ‘ती माझी बायको…’ गुंड गावात घुसल्यावर ‘तो’ आला गाडीसमोर, हा राजकीय ड्रामा अन्…

मुंबई तक

पारनेरमधील एका गावातील ग्रामपंचायतीमधील सरपंच पदावरुन मोठा राडा झाला. ज्यामध्ये गावकऱ्यांनी एकत्र येऊन विरोधकांचा डाव हाणून पाडला. पाहा यावेळी गावकऱ्यांनी नेमकं काय केलं.

ADVERTISEMENT

There was a big uproar from the post of sarpanch in the gram panchayat of a village in Parner. In which the villagers united and foiled the plan of the opponents. See what the villagers actually did this time.
There was a big uproar from the post of sarpanch in the gram panchayat of a village in Parner. In which the villagers united and foiled the plan of the opponents. See what the villagers actually did this time.
social share
google news

News on Maharashtra Politics: रोहित वाळके, पारनेर: आज-काल राजकारणात गुंडशाहीचा शिरकाव झाला आहे. त्याला रोखणं फारच कठीण झालं आहे. मात्र, आमदारांच्या गुंडशाहीविरोधात अख्खं गाव जेव्हा एकवटतं आणि या गुंडांना गावातून पिटाळून लावतं तेव्हा त्याची चर्चा तर होणारच ना भाऊ.. अशीच काहीशी जबरदस्त घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात पारनेर (Parner) तालुक्यात घडली आहे.

तर झालं असं की, पारनेर तालुक्यातील देसवडे या लहानश्या गावातील सरपंच जनाबाई पोपट दरेकर यांच्यावरील अविश्वास ठराव हा बारगळला. अतिशय नाट्यमय घडामोडीत देसवडे गावातील ग्रामपंचायत सरपंच कार्यालयात हजर होताना बरीच वादावादी झाली. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु पारनेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले नाही.

अविश्वास ठरावाच्या विरोधात पाच विरुद्ध चार अशा मताने ठराव संमत झाला. त्यामुळे सरपंच बाईंचं पद अबाधित राहिलं. अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर 22 जुलैला भाऊसाहेब गणपत टेकुडे यांनी सचिन भोर व सुयोग दाते (रा. देसवडे ता. पारनेर) यांच्यावर ग्रामपंचायतील काही सदस्यांचे अपहरण करून त्यांना लपवून ठेवण्यात आलं असल्याची फिर्याद देण्यात आली होती. तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे गाव असलेल्या देसवडे येथील सरपंचावरील अविश्वास ठराव पारित करण्यासाठी केलेला आटापिटा केविलवाणा असल्याची चर्चा देखील यानिमित्ताने सुरू झाली.

‘ती माझी बायको आहे..’

दरम्यान, अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यासाठी मतदानाला सदस्यांना काही गाड्यांमधून गावात आणण्यात आलं. त्यावेळी आमदार लोगो लावलेल्या गाड्यांमध्ये या गावातील सदस्यांना बसविण्यात आलं होतं. अविश्वास ठराव पास व्हावा आणि सध्या असलेल्या सरपंचाचं पद जावं यासाठी ही सगळी खेळी असल्याचं गावकऱ्यांचा लक्षात आलं. त्यामुळे याच खेळीविरोधात अख्खं गाव एकत्र आलं. यावेळी गावकऱ्यांनी सदस्यांना ज्या गाड्यांमधून गावात आणलं जाणार होतं त्या गाड्याच गावच्या वेशीवर अडवल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने गाड्यांमधून आलेल्या बाहेरील लोकांना फारसा काही आक्षेप घेता आला नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp