फडणवीसांनी मोदींकडे शब्द टाकला अन् अप्पासाहेबांना…; शाहांनी सांगितला किस्सा
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अमित शाह यांनी पद्मश्री पुरस्काराबद्दलचा किस्साही सांगितला.
ADVERTISEMENT
निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. समाजसेवेतील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. खारघर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अमित शाह यांनी भावना व्यक्त केल्या. नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हाती घेतलेल्या समाजाच्या सेवेचा गौरव शाह यांनी केला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत योग्य असून, याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, असे उद्गार शाह यांनी यावेळी काढले. यावेळी अमित शाह यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दलचा किस्साही सांगितला.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात बोलताना अमित शाह म्हणाले, “प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकाच्या सन्मानासाठी लाखो लोकांची गर्दी मी माझ्या आयुष्यात कधीही बघितली नाही. तिथपर्यंत नजर पोहोचू शकणार इतकं मोठं मैदान, 42 अंश सेल्सिअस तापमान बसलेल्यांकडे बघून कळतंय की, त्यांच्या मनात अप्पासाहेबांबद्दल किती भक्तिभाव, सन्मान आहे. हा भक्तिभाव त्याग, सेवा, समर्पण यातून निर्माण होतो.”
महत्त्वाची बातमी >> राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? शरद पवारांचं सूचक विधान, राऊतांनी सांगितली स्टोरी
“असं म्हणतात की गर्दीचं अनुसरण करू नका. असं काहीतरी करा की गर्दी तुमचं अनुसरण करेल, अप्पासाहेब तुम्ही असं करून दाखवलं आहे. लाखो लोक तुमचं अनुसरण करण्यासाठी उन्हांच्या झळात बसले आहेत”, असं शाह यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघत आहे -अमित शाह
“मी वयाच्या 12 वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे. इतिहासाचा विद्यार्थी आहे. देशविदेशातील इतिहास मी व्यवस्थित वाचला आहे. मी अनेकवेळा बघितलं की, लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक पिढ्यांपर्यंत राहते. मी हेही बघितलं आहे की, एकाच कुटुंबात अनेक वीर जन्म घेतात.”
“सरस्वतीची कृपाही काही कुटुंबांवर अनेक पिढ्यांपर्यंत राहते. पण, समाजसेवेचा संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत राहणं, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहे. आधी नानासाहेब, मग अप्पासाहेब आणि आता सचिन भाऊ आणि त्यांचे दोन भाऊ हा संस्कार पुढे नेत आहेत.”
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस, मोदी आणि पद्म पुरस्कार, शाहांनी सांगितला किस्सा
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यांनी आग्रहाने मोदीजींना सांगितलं की, अप्पासाहेबांना पद्म पुरस्काराने सन्मानित करा. आणि भारत सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केलं. महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार 1995 पासून… भाजप-शिवसेना सरकारने याची सुरूवात केली. महाराष्ट्र आणि देशसेवेत योगदान देणाऱ्या अनेक लोकांना हा पुरस्कार दिला गेला”, असं शाह यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
“पु.ल. देशपांडेपासून, स्वरकोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, विजय भाटकर, रघुनाथ मार्शलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुलोचनाजी आणि एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जात आहे”, असं अमित शाह म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT