Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी कोरडं हवामान, तर काही भागात तापमानात वाढ होणार?
maharashtra weather : राज्यात सध्या हिवाळ्याच्या सुरुवातीला थंडीने जोर धरला असून, 26 नोव्हेंबरला किमान तापमान सामान्यपेक्षा खाली राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार महत्त्वाची अपडेट.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात हिवाळ्याच्या सुरुवातीला थंडीने जोर धरला
26 नोव्हेंबरला किमान तापमान सामान्यपेक्षा खाली
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय?
Maharashtra Weather : राज्यात सध्या हिवाळ्याच्या सुरुवातीला थंडीने जोर धरला असून, 26 नोव्हेंबरला किमान तापमान सामान्यपेक्षा खाली राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहील, तर कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे किरकोळ पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'मराठी असले तरी फडणवीस, शेलार आणि साटम यांच्यात...' मुंबई तकच्या चावडीवर अंबादास दानवे कडाडले
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरडं वातावरण राहिल असा अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे काही ठिकाणी उष्णता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर काही प्रमाणात तामानात बदल होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान कोरंड राहण्याचा हवामान विभागाने इशारा दिला. तापमानात काही अंशी प्रमाणात फरक जाणवेल, पण त्याचा फार परिणाम होणार नाही.










