ED Officer Arrested : ईडी अधिकाऱ्याला अटक, 8 किमी पाठलाग करून आवळल्या मुसक्या
ED Officer Ankit Tiwari News In Marathi : तामिळनाडू पोलिसांनी 8 KM कारचा पाठलाग करून 20 लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या ED अधिकाऱ्याला अटक केली.
ADVERTISEMENT
Ankit Tiwari Enforcement Directorate : समोर आरोपी आणि मागे पोलीस… असे सीन अनेकदा सिनेमात बघायला मिळतात. पोलीस आरोपीचा पाठलाग करतात आणि मुसक्या आवळतात. अशीच सिनेस्टाईल प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. पण, पोलिसांनी ज्याला अटक केली, तो ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयाचा अधिकारी आहे. तामिळनाडूमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. अंकित तिवारी असे ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. (Tamil Nadu police arrest ED officer in bribery case)
ADVERTISEMENT
तामिळनाडू पोलिसांनी अंकित तिवारीला त्याच्या कारचा दिंडीगुल-मदुराई महामार्गावर आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून अटक केली. आरोपीला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेनंतर त्याच्या दिंडीतील घरावर छापा टाकण्यात आला.
ईडी अधिकारी अंकित तिवारी अटक प्रकरण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासात मदुराई आणि चेन्नईतील अनेक ईडी अधिकारी या प्रकरणात सामील असल्याचे उघड झाले आहे. अंकित तिवारी अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळत होता. एवढेच नाही तर त्याने ही लाचेची रक्कम ईडीच्या इतर अधिकाऱ्यांमध्येही वाटून घेतली.
हे वाचलं का?
सरकारी कर्मचाऱ्यांकडून उकळत होते पैसे
अंकित तिवारीने 29 ऑक्टोबर रोजी दिंडीगुलच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी संपर्क साधला होता. मात्र, ते प्रकरण बंद करण्यात आले. तिवारीने कर्मचाऱ्याला सांगितले की, पीएमओने ईडीला या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा >> ‘शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती, पण…’
त्याने कर्मचाऱ्याला 30 ऑक्टोबरला मदुराई येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. ज्या दिवशी कर्मचारी ईडी कार्यालयात पोहोचला, त्यादिवशी ईडी अधिकारी अंकित तिवारीने या प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 3 कोटी रुपयांची लाच मागितली होती. नंतर तिवारीने कर्मचाऱ्याला सांगितले की मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांनी ही रक्कम कमी करून 51 लाख रुपये करण्याचे मान्य केले आहे.
ADVERTISEMENT
ईडी अधिकारी अंकित तिवारीला पकडले रंगेहात
1 नोव्हेंबर रोजी सरकारी कर्मचाऱ्याने ईडी अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता दिल्याचा आरोप आहे. यानंतर तिवारी यांनी ही रक्कम बड्या अधिकाऱ्यांमध्ये वाटून दिली जाईल, असे सांगून संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. वेळेवर पैसे न दिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरेंच्या नेत्याला कोर्टाने जामीन दिला, पण घातल्या 5 अटी
अंकित तिवारीच्या मागणीवर संशय आल्याने या सरकारी कर्मचाऱ्याने 30 नोव्हेंबर रोजी DVAC च्या दिंडीगुल युनिटमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर तिवारी हे ईडी अधिकारी म्हणून आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या कारणावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी अंकित तिवारी याला आणखी 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT