Extra Marital Affair : विवाहबाह्य संबंध ठेवाल तर वाट लागेल, कारण…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

extra marital affair cheating wife or husband side effect relationship story
extra marital affair cheating wife or husband side effect relationship story
social share
google news

देशभरात विवाहबाह्य संबंधाचे (Extra Marital Affair) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याची प्रचिती आपल्याला दररोजच्या वृत्तपत्रातून वाचण्यात येणाऱ्या गुन्ह्याच्या बातम्यातून नक्कीच येते.सध्या या वाढत्या विवाहबाह्य संबंधामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत चालली आहेत, आणि अजूनही होत आहेत. त्यामुळे या विवाहबाह्य संबधांचे दुष्परीणात काय आहेत? असे संबंध ठेवणे तुमच्या नात्यासाठी किती नुकसानदायक ठरून शकते, हे जाणून घेऊयात. (extra marital affair cheating wife or husband side effect relationship story)

ADVERTISEMENT

एखादा व्यक्ती विवाहबाह्य संबधात आल्यावर त्याचे फक्त जोडीदारासोबतचे नाते तूटत नाही, तर त्याची मुलबाळ देखील दुरावली जातात. जवळचे नातेवाईक देखील दुर होतात असे अनेक समस्या उद्भवतात.

नात्यावरचा विश्वास उडतो

कोणत्याही नात्यात विश्वास हा खूपच महत्वाचा होता. जर या विश्वासाला तडा पोहोचला तर सारं काही संपून जाते. त्यामुळे ज्यावेळेस तुमच्या पार्टनरला तुमच्या या अनैतिक नात्याबद्दल कळतं. त्यावेळीस त्याचा तुमच्यावरचा विश्वास उडालेला असतो. अशा परिस्थितीत तो पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवेल, याची अपेक्षा न केलेली बरीच.इतकं सगळं घडून सुद्धा जरी तो व्यक्ती तुमच्यासोबत राहण्यास तयार झाला असला तरी, त्याच्यासाठी ते नाते पुर्णताह संपलेले असते. तसेच ज्या दु:खातून तुमचा पार्टनर गेला आहे. त्याच दुखाची जाणीव तुम्हाला देखील व्हावे,अशी त्याची अपेक्षा असते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Rain Update : मुंबईसह महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार, बाप्पाच्या आगमनालाच बरसणार मुसळधार

मानसोपचारतज्ज्ञ लागतो

आपल्या जोडीदाराला धोका देणारा माणूस कधीच शांततेत जगू शकत नाही. कारण आज ना उद्या त्याच्यात अपराधीपणाची भावना, लाज, चिंता आणि विश्वासाची समस्या जाणवू लागते. तसेच धोका देताना जोडीदाराची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था त्याची देखील होती. त्याला देखील राग, नैराश्य आणि विश्वासाच्या समस्येतून जावे लागते. कधी कधी या नात्याचा मनावर इतका खोलवर परिणाम होतो की मानसोपचार तज्ज्ञाची देखील मदत घ्यावी लागते.

मुलांवर गंभीर परिणाम

विवाहबाह्य संबंधाचा मुलांवर देखील खोलवर परिणाम होतो. मुलांना या नात्याची खूप चीड येते. तसेच ते त्यांच्या पालकांचा देखील आदर करत नाही. वयानुसार मुलांमध्ये हा द्वेष इतका झपाट्याने वाढतो की काही काळानंतर ते आपल्या पालकांशी असलेले नाते देखील तोडून टाकतात.

ADVERTISEMENT

जोडीदाराला सोडणे किती सोप्पे आहे?

अनेकजण पार्टनरला धोका देऊन त्या नात्यातून सहज निघून जाण्याच्या विचारात असतात. मात्र आपल्या पार्टनरला फसवून त्या नात्यातून शांतपणे निघून जाणे इतकं सोप्पे नाही आहे. जर जोडीदाराला हवं असेल तर तो तुमचे बॅक अकाऊंट देखील खाली करू शकतो. कारण विवाहबाह्य संबंधात अनेकदा महागडे घटस्फोट होतात.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : चालत्या बाईकवर त्या जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, ट्रॅफिक पोलिसांनी काय केलं पाहा

नातेवाईक नाते तोडतात

विवाहबाह्य संबंधाचा नातेवाईकांवर देखील गंभीर परिणाम होतो. कारण जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपले आयुष्य जगतो, त्याचा नेहमीच आदर होतो. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य संबंधांची बातमी समाजात पसरते, तेव्हा त्याचे संपूर्ण नातेवाईक त्याच्याशी संबंध तोडतात. त्यामुळे अशा घटनांमध्ये नातेवाईक देखील साथ सोडतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT