Facebook Instgram Down : जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन, नेटकरी चिंतेत

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

facebook instagram down in worldwide users are shock social messaging app
जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
social share
google news

Facebook Instgram Down :  जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याचे वृत्त हाती आले आहे. अनेक युझर्सचे फेसबूक अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत असल्याची तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारीनंतर आता  जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे नेटकरी चिंतेत पडले आहे. (facebook instagram down in worldwide users are shock social messaging app) 

जगभरातील अनेक युझर्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मेसेंजिंग अॅप मोठ्या प्रमाणावर वापरत असतात. या युझर्सना आज हे मेसेजिंग अॅप वापरत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अनेकांची फेसबुक अकाऊंट अचानक लॉग आऊट झाली होती. या दरम्यान अनेकांनी त्यांचे अकाऊंट लॉग इन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अनेक युझर्सचे फेसबुक सुरूच झाले नव्हते.  

इन्स्टाग्राम युझर्सना देखील सोशल मेसेजिंग अॅप वापरत असताना अनेक अडचणी येत होत्या. इन्स्टाग्राम फीड रिफ्रेश होत नव्हत्या. जुन्याच फिड दाखवत होत्या. त्यामुळे इस्टाग्रामही डाऊन झाले होते. या दोन्ही अॅपवर तांत्रिक अडचणी आल्याने नेटकरी चिंतेत पडले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान इस्टाग्राम आणि फेसबूक डाऊन झाल्यानंतर ट्वीटरवर instagram down हॅशटॅग ट्रेंड करू लागला आहे. या हॅशटॅग खाली अनेकजण भन्नाट मीम्स शेअर करत आहे. तसेच अद्याप तरी फेसबुक आणि इंस्टाग्राम कधीपर्यंत पुर्ववत होईल याची माहिती मिळू शकली नाही आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT