Gautami Patil : कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी, कारण…
डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर कोल्हापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. पोलिसांकडे गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
ADVERTISEMENT
Gautami Patil Latest News : प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिला कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या निर्णयामुळे फटका बसणार आहे. जिल्हा पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरच बंदी घातली आहे. यामागच्या कारणाचा खुलासाही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (Ban on Gautami Patil Program in Kolhapur district)
ADVERTISEMENT
गौतमी पाटील हिचं नाव राज्याच्या घराघरात पोहचलंय. तिचं नृत्य पाहण्यासाठी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी पंचक्रोशीतील शौकीन गर्दी करतात. राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या गौतमी पाटीलवर गणेशोत्सव काळात कोल्हापुरात मात्र कार्यक्रमांसाठी बंदी घालण्यात आलीये.
हेही वाचा >> Sanjay Raut : गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?
कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. उत्सव काळात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून देखावे तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सध्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून गौतमी पाटीलला पसंती दिली जात आहे.
हे वाचलं का?
कुणी केलं होतं कार्यक्रमाचं आयोजन?
विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्या शोचं आयोजन केलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली आणि राशिवडे इथं देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली गेली होती.
हेही वाचा >> Women Reservation : 5 कारणं… जी सांगतात महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?
पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर का घातली बंदी?
‘गणेशोत्सव काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. या काळात जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवल्यास प्रचंड गर्दी होईल. त्यामुळं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त देणं शक्य होणार नसल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं. त्यामुळं गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यास उत्सुक असलेल्या संयोजकांचा हिरमोड झाला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन, पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT