Ghaziabad: 14 वर्षाच्या मुलाने बापाच्या मांडीवरच तडफडून सोडला जीव! काय घडलं, कुणाची चूक?

रोहिणी ठोंबरे

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रेबीजचं एक भयानक प्रकरण समोर आलं, जिथे एका 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला. तो हवा आणि पाण्याला घाबरून अंधारात राहू लागला. मुलाची बिकट अवस्था पाहून नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. साबेजला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ghaziabad Boy Dies of Rabies : रेबीज हा एक असा भयानक आजार आहे ज्यावर वेळीच प्रतिबंध आणि उपचार न केल्यास व्यक्ती एकतर कोमात जातो किंवा त्याचा तडफडून मृत्यू होतो. हा मृत्यू खूप वेदनादायी असतो. मंगळवारी (5 सप्टेंबर) , उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रेबीजचं एक भयानक प्रकरण समोर आलं, जिथे एका 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला. या प्रकरणात कशी आणि कोणाची चूक होती? कोणाच्या बेजाबदारपणामुळे हे घडलं? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Ghaziabad Boy Dies of Rabies Over a Month After Dog Bite)

हे प्रकरण विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरणसिंग कॉलनी येथील आहे. येथे पाच दिवसांपूर्वी साबेज नावाच्या मुलामध्ये रेबीजची लक्षणं दिसून आली. तो हवा आणि पाण्याला घाबरून अंधारात राहू लागला. मुलाची बिकट अवस्था पाहून नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. साबेजला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

INDIA Vs Bharat : ‘भाजप जिन्नांच्याच विचाराची री ओढतेय’, शशी थरुरांनी सांगितला इतिहास

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

याकुब नावाच्या व्यक्तीचा 14 वर्षांचा मुलगा साबेज याला महिनाभरापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. मुलाने भीतीपोटी याबाबत कोणालाही माहिती न दिल्याने येथे प्रथम निष्काळजीपणा दिसून आला. 5 दिवसांपूर्वी त्याच्या शरीरात विचित्र बदल दिसू लागले. त्याच्या तोंडातून लाळ टपकत होती आणि त्याला पाणी प्यायलाही भीती वाटत होती. चेहराही विचित्र झाला होता.

त्यानंतर घरच्यांना काळजी वाटू लागली. पण त्याला काहीच समजत नव्हते. दुसरा निष्काळजीपणा येथे दिसून आला. कुटुंबीयांनी त्याची प्रथम तपासणी केली नाही. त्यानंतर त्या मुलाने सांगितले की, त्याला महिनाभरापूर्वी कुत्रा चावला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp