लग्नाआधीच नवऱ्यानं बायकोला दिलं सरप्राईज! रुममधील 'तो' Video झाला व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Husband And Wife Room Video Viral
Groom And Bride Shocking Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कपलचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

point

नवऱ्याचं सरप्राईज पाहून बायको झाली भावुक

point

व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी केला मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव

Groom And Bride Shocking Video Viral: लग्नसराईचा हंगामा सुरु झाला असून नव्या जोडप्यांना एकमेकांना भन्नाट सरप्राईज देण्याचं वेध लागलं आहे. नवरा छोटे-मोठे गिफ्ट देऊन पत्नीला खूश करण्याचा प्रयत्न करत असतो. पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याकडून मोठ मोठे गिफ्टही दिले जातात. परंतु, नुकतच व्हायरल झालेल्या एका कपलच्या व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण लग्नाआधीच नवऱ्याने त्याच्या बायकोला भन्नाट सरप्राईज दिलं आहे. नवरी रुममध्ये बसलेली असताना नवरा अचानक एन्ट्री मरतो आणि नवरीला सरप्राईज देतो. या जोडप्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. 

ADVERTISEMENT

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, नवऱ्याने त्याच्या बायकोला तिच्या अत्यंत आवडीचं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट एखाद्या वस्तुरुपात दिलं नसून, त्या गिफ्ट बॉक्समध्ये चक्क एक मांजर असल्याचं पाहायला मिळत आहे. नवरीने ही मांजर हातात घेतल्यानंतर तिच्या भावनांचा उद्रेकचा झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मांजरीला हातात घेत ही महिला भावुक झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हे ही वाचा >> Bollywood Actress: भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? 4600 कोटींचं नेटवर्थ, नाव वाचून थक्कच व्हाल

साराविया हुसेन नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, एक तरुणी लग्नाच्या आऊटफिटमध्ये तिच्या मित्रमंडळींसोबत एका रुममध्ये बसली आहे. त्याचवेळी तिचा पती हातात मांजर घेऊन रुममध्ये प्रेवश करतो आणि ती मांजर पत्नीला गिफ्ट म्हणून देतो. पत्नीला अशाप्रकारचं सरप्राईज मिळाल्यानंतर तिच्याही भावना दाटून येतात.

हे वाचलं का?

इथे पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ज्या महिला पाळीव प्राण्यांवर प्रेम करतात, त्यांना असाच पार्टनर मिळावा. एका अन्य यूजरने म्हटलं, मी पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करते. माझ्या पार्टनरनेही त्या प्राण्यांची काळजी घ्यावी. 

हे ही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! पुन्हा कधी मिळणार 1500 रुपये? 'ही' माहिती एकदा वाचा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT