Hari Narke passed away : पुरोगामी चळवळीचा शिलेदार गेला! हरी नरके यांचे निधन

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

professor hari narke dies due to heart attack in mumbai
professor hari narke dies due to heart attack in mumbai
social share
google news

Hari Narke Death News : ज्येष्ठ विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ. हरी नरके यांचं निधन झाले. त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ते 70 वर्षांचे होते. हरी नरके यांना मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखरेचा श्वास घेतला. महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि विचारांचा प्रसार करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीतील एक शिलेदार गेल्याने हळहळ व्यक्त होतं आहे.

ADVERTISEMENT

हरी नरके यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. बुधवारी (9 ऑगस्ट) सकाळी पुण्याहून मुंबईकडे येत असतानाच त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वाचा>> Ncp ECI : राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह काढून घेतलं जाऊ शकत, पण…; शरद पवारांनी काय सांगितलं?

हरी नरके यांचा जन्म 1 जून 1963 रोजी झाला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्रात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले होते. नरके यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि विचारांसंदर्भात विपुल लेखन केले. त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.

हे वाचलं का?

हरी नरके महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. त्याबरोबर पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणूनही ते काम बघत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ते समन्वयक होते.

शरद पवारांनी व्यक्त केला शोक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हरी नरके यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले”, असे पवारांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

’70 हजार कोटी घोटाळ्यात केस पृथ्वीराज चव्हाणांनी केली’, भाजप खासदाराचा सुप्रिया सुळेंना उलट सवाल

“हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले”, असंही पवारांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

“हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली”, अशा शब्दात शरद पवारांनी हरी नरकेंबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT