IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना मोठा दणका, नोकरी जाणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल मोठा निर्णय

point

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले

point

अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रामुळे नोकरी जाणार?

IAS officer Pooja Khedkar LBSNAA : वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका बसला आहे. आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्र सरकारच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना परत बोलवून घेण्यात आले आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासनाने तसे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवले असून, राज्य सरकारने प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करत त्यांना मुक्त केले आहे. (Probationary IAS officer Pooja Khedkar's Training program canceled by lal bahadur shastri national academy of administration)

ADVERTISEMENT

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली आहे. बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि बनावट नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रश्न उपस्थित होत असून, केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमली आहे.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासन पूजा खेडकरांवर कारवाई करणार?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेत असतानाच आयएएस पूजा खेडकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कॅबिन बळकावली होती. त्याचबरोबर प्रशिक्षण कालावधीतच अनेक गोष्टींची मागणी केली होती, ज्या नियमानुसार चुकीच्या होत्या. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना अहवाल पाठवला. हा अहवाल लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीकडे पाठवण्यात आला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "कुणी काय केलं सगळं माहितीये", क्रॉस व्होटिंगवर आमदाराने सोडलं मौन 

पूजा खेडकरांना हजर व्हायला सांगा; लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीचे पत्र

त्याची दखल घेत अकादमीने पूजा खेडकरांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. अकादमीने महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र पाठवले आहे. पुण्यातील प्रशिक्षण कालावधीदरम्यान पूजा खेडकर यांच्या वर्तणुकीबद्दलचे महाराष्ट्र सरकारच्या पत्रानुसार, असा निर्णय घेण्यात आला आहे की, पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना परत अकादमीमध्ये बोलवून घेण्यात येत आहे.

lal bahadur shastri national academy of administration has been canceled Training program of Probationary IAS officer Pooja Khedkar.
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासनाकडून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेले पत्र.

पूजा खेडकर यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे आणि त्यांना अकादमीमध्ये हजर होण्यास सांगावे, असे या पत्रात म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> खासदार शाहू महाराजांना पोलिसांना अडवलं, विशाळगडावर नो एंट्री 

महाराष्ट्र सरकारने पूजा खेडकरांना केले मुक्त

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासनाचे पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने पूजा खेडकर यांना मुक्त केले आहे. अकादमीने तुम्हाला तातडीने हजर होण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला मुक्त करण्यात येत असून, २३ जुलैच्या आधी हजर व्हावे, असे राज्य सरकारने पूजा खेडकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT