Mumbai Weather Forecast : मुंबईत धो धो बरसणार! ठाणे, पालघरला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
मुंबई आणि महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई हवामान अंदाज १८ जुलै २०२४

point

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार?

point

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर हवामान अंदाज

Mumbai weather news : मुंबई शहर, मुंबई उपनगरांमध्ये गुरुवारी (18 जुलै) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने ऑरेंज् अलर्ट जारी केला आहे. (IMD predicts Heavy to Very Heavy Rainfall in Mumbai, thane and other districts of maharashtra)

ADVERTISEMENT

Mumbai Weather Forecast 18 July : मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात कुठे कसा असेल पाऊस?

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे? 

18 जुलै रोजीसाठी हवामान विभागाने पालघर, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. 

IMD alert to mumbai and other district of maharashtra, see weather map
मुंबई, पुणे, ठाण्यासह महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान?

विदर्भात कसे असेल हवामान?

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड याजिल्ह्यात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT