Chandrayaan-3: ना पेट्रोल- ना डिझेल, तरीही तुफान वेगाने चंद्रावर कसं पोहचणार यान?
सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (ISRO) सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. इस्रोची तिसरी मोहीम सध्या त्यांच्या मार्गावर आहे. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथून याचे यशस्वीरित्या लॉन्चिंग करण्यात आले. यानंतर ते आतील कक्षेत स्थापित झाले. येथून चांद्रयान-3 लंबवर्तुळाकार मार्गाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
ADVERTISEMENT

ISRO : Chandrayaan-3 : सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (ISRO) सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. इस्रोची तिसरी मोहीम सध्या त्यांच्या मार्गावर आहे. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथून याचे यशस्वीरित्या लॉन्चिंग करण्यात आले. यानंतर ते आतील कक्षेत स्थापित झाले. येथून चांद्रयान-3 लंबवर्तुळाकार मार्गाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. 42 दिवसांत तो चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा प्रवास पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. चांद्रयान-3 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर जाणाऱ्या रॉकेटमध्ये कोणते फ्यूल वापरले गेलेय आणि ते कसे कार्य करते याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (In ISRO’s Chandrayaan-3 Mission Which Fuel Used In Rocket)
चांद्रयान-3 चा प्रवास 42 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, आता अशा स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला आहे की, 43.5 मीटर उंच आणि 642 टन वजन असलेल्या या रॉकेटमध्ये कोणते फ्यूल वापरण्यात आले आहे?
Kirit Somaiya यांचा ठाकरेंकडून तीनदा ‘गेम’, अमित शाहांसमोरच..; नेमका वाद काय?
या रॉकेटच्या पहिल्या टप्प्यात सॉलिड फ्यूलचा (Solid FUel) आणि दुसऱ्या टप्प्यात लिक्वीड फ्यूलचा (Liquid Fuel) चा वापर करण्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिन आहे. यामध्ये लिक्वीड हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा वापर केला जातो. चांद्रयान-3 मोहिमेतील रॉकेटच्या फ्यूल टँकची क्षमता 27,000 किलोपेक्षा जास्त आहे.
चांद्रयान-3 रॉकेट इंजिन संबंधित माहिती
ISRO ने चांद्रयान-3 साठी CE 2 क्रायोजेनिक इंजिन डिझाइन केले आहे. जे LVM3 प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक वरच्या टप्प्याला उर्जा देण्याचे काम करेल.