Irshalwadi Landslide : ‘हवाई मार्गे जेसीबी नेण्याचे प्रयत्न’, मृतांचा आकडा वाढला
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत.
ADVERTISEMENT

Irhsalwadi landslide latest update : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडीतील दृश्य बघून अवघ्या महाराष्ट्राचे डोळे डबडबलेत. कुणाच वडील, कुणाचा मुलगा, कुणाची आई, तर कुणाचं संपूर्ण कुटुंबच भल्यामोठ्या दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान रात्रीपासून झटत असून, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखालीच आहेत. पावसांचं थैमान अन् कुठलीही मशिनरी नेणे अशक्य असल्याने अडचणीचा सामना करत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिथे सायकलीही जात नाही, अशा इर्शाळवाडीतील मदतीला वेग देण्यासाठी आता सरकारने हेलिकॉप्टरने जेसीबी मशिन घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती विधानसभेत दिली. (NDRF teams are carrying out rescue operations in Irshalwadi landslide Inccident)
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं की, 25 ते 28 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. सुरूवातीला 21 जखमींपैकी 17 जणांना त्याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये उपचार करण्यात आले. तर 6 जणांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाचा >> Irshalwadi Landslide : ‘गिरीशजी, सीएम आलेत म्हणून…’, अजित पवारांनी सुनावलं
सकाळी 10.15 वाजेपर्यंत या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मदत मोहीम सुरू आहेत आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या म्हणजे 60 जवान बचाव कार्यात लागलेले आहेत.
Live: शिंदे थेट डोंगरावर पोहचले, इर्शाळवाडीत अजून किती लोक ढिगाऱ्याखाली? #IrshalwadiLandslide #RaigadLandslide #EknathShinde @madhavidesai10 https://t.co/YGjp4frO7m
— Mumbai Tak (@mumbaitak) July 20, 2023