जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला चेंगराचेंगरीचा व्हिडीओ, म्हणाले…
आमदार जितेंद्र आव्हाडांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर झालेले मृत्यू उष्माघातामुळे झाले की, चेंगराचेगरीमुळे असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला.
ADVERTISEMENT

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्री सदस्यांपैकी 13 सदस्यांचा मृत्यू झाला. 13 जणांचा मृत्यूचं कारण उष्माघाताने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकारण तापलेलं असताना आता एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आमदार जितेंद्र आव्हाडांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला आहे.
16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर दुर्दैवी घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सेवानिवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्याची मागणीही आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. या घटनेसाठी विरोधकांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवलं आहे. या घटनेची चर्चा सुरू असताना आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करतांना आव्हाडांनी प्रश्नही उपस्थित केला आहे. “समाज माध्यमांमधून हा व्हिडीओ आला आहे. हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते. हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
समाज माध्यमां मधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा ? pic.twitter.com/J6QMWKKDeP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2023