जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंवरच चिडले, म्हणाले, “दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा…”

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

jitendra awhad hits out at eknath shinde over patients death in kalwa hospital
jitendra awhad hits out at eknath shinde over patients death in kalwa hospital
social share
google news

Kalwa Hospital News : कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. यावरून ठाण्यातील राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच हे घडल्याने विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यानंतर शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलं. पण, आता जितेंद्र शिंदेंवर चिडलेत. त्यांनी काय म्हटलंय तेच वाचा…

ADVERTISEMENT

कळव्यातील रुग्णालयात तीन चार दिवसांत 27 पेक्षा जास्त रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यानंतर मंगळवारी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना विरोधकांना सुनावले.

वाचा >> ‘खोके-खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर…’, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट

शिंदे म्हणाले की, “विरोधकांनी या घटनेचे राजकारण करू नये. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नये.” शिंदेंच्या याच विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भडकले.

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाड यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर

कळवा रुग्णालय भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांच नाव घेता काही विरोधक जाणीवपूर्वक मृत्यूचं राजकारण करत असल्याची टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला देतांनाच त्यांच्यावर पलटवार केलाय.

वाचा >> ‘…याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका’, शिवसेना (UBT) शिंदेंवर का भडकली?

“दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा हॉस्पिटल सुधरावं. आमच्या चुका झाल्या असतील, तर आम्ही हॉस्पिटलसमोर जाऊन नाक घासून माफी मागायला तयार आहोत. मात्र 25 जणांचा मृत्यू झाला त्यांच काय करायचं ते ठरवा?”, असा सवाल आव्हाडांनी शिंदेंना केला.

ADVERTISEMENT

आम्हाला बोलायला लावू नका, आव्हाडांचा इशारा

“तिथे काय काय कमी आहे, ते बघा. उगाच आपल्यावरचा दोष दुसऱ्यांवरती ढकलण्याचा प्रयत्न करू नका. घटनेचं गांभीर्य असतं, तर पाचव्या मिनिटाला तुम्ही तिथे आला असता. दोन दिवस तिथे कोणी आलं नाही. त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला लावू नका”, असं जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंना म्हणाले.

ADVERTISEMENT

“मुख्यमंत्री आमच्या शहरातील आहेत. त्यामुळे आम्ही जास्त टीका टिप्पणी करत नाही. इतकं मोठं प्रकरण झाल्यानंतर ज्याची शरद पवारांनी दखल घेतली, तरी आपल्याला यायला किती वेळ झाला हे जनतेला दिसत आहे”, असंही आव्हाड शिंदेंना उत्तर देताना म्हणाले.

वाचा >> Nawab Malik : ना अजित पवार, ना शरद पवार… मलिकांचा नेमका ‘गेम’ काय?

“तुम्ही या शहराबाबत किती गंभीर आहात, हे शहराला दिसत आहे. त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवू नका आम्ही तुमच्याकडे बोट दाखवल नव्हतं. कारण नसताना आमच्यावर शिंतोडे उडवू नका, तुमच्या अंगावर जास्त उडतील”, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT