Kashmir Terror Attack: कुटुंबासह काश्मीर फिरायला गेले अन्... दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू

मिथिलेश गुप्ता

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीमधील तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू
दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू
social share
google news

डोंबिवली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा देखील समावेश असल्याचं समजतं आहे. संजय लेले, अतुल मोने, अशी दोन पर्यटकांची नावं असून तिसऱ्या पर्यटकाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही.

डोंबिवलीतील तिघांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण कुटुंबासमवेत शनिवारी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मृत झालेले तिघेही जण हे डोंबिवली पश्चिमेला राहणारे आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. 

दरम्यान मृत झालेल्यापैकी काही जण हे शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे नातेवाईक आहेत. दरम्यान, या दहशतवादी हल्यात आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला राजेश कदम यांनीही दुजोरा दिला आहे. ते बुधवारी पहाटे काश्मीरला रवाना होत असून मृतांचे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात आहेत असे कदम म्हणाले.

हे ही वाचा>> Terror Attack: पतीच्या मृतदेहाशेजारी पत्नी अन्... 'हा' फोटो तुमचं काळीज टाकेल पिळवटून!

डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरात राहणारे अतुल मोने त्यांच्यासोबत सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हे आपल्या कुटुंबासह काश्मिरला गेले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp