Kuwait Fire: लालची मालकामुळे 40 भारतीय जळून खाक, हादरवून टाकणारी घटना
Kuwait Building Fire Case : कुवैतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 43 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 30 जण या घटनेत गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. इमारतीच्यी एका रुममध्ये ही आग लागली होती
ADVERTISEMENT
Kuwait Building Fire Case : कुवेतमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 43 भारतीयांचा आगीत जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 30 जण या आगीत गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. इमारतीच्यी एका रुममध्ये ही आग लागली होती. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारभर पसरली होती. त्यामुळे या इमारतीक राहणाऱ्या भारतीयांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (kuwait building fire case indian worker dead shocking story)
ADVERTISEMENT
कुवेतमधील मंगाफ शहरात सहा मजल्याची एक इमारत आहे. या इमारतीच्या एका किचनमध्ये बुधवारी आग लागल्याची घटना घडली होती. कुवेतच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली होती. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण इमारतभर पसरली होती. त्यामुळे साखर झोपेत असलेल्या अनेकांचा या आगीत जळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण झोपेत असल्याने त्यांना या घटनेची कल्पनाच आली नाही ते आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते. या भीषण आगीच्या घटनेत 40 भारतीय कामगारांचा मृ्त्यू झाला आहे. या घटनेत अनेक जणांचा धुव्यात गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेत काहींचा बचाव करण्यात यश आले आहे.
हे वाचलं का?
एका वरिष्ठ पोलीस कमांडरने दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीत आगीची घटना घडली होती. त्या इमारतीत मोठ्या संख्येने मजूर राहायचे. या इमारतीत जास्त कामगार ठेवू नये आम्ही रियल इस्टेट ड़िलरला सूचना केल्या होत्या. मात्र या सूचना त्यांनी मान्य केल्या नव्हत्या.रिअल इस्टेट डीलरने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. कुवेतच्या उप पंतप्रधानांनी 41 लोकांच्या मृत्यूला रियल इस्टेट डिलरमुळे झाल्यााचा आरोप केला आहे.
पंतप्रधांन मोदींचं ट्विट
कुवेतमधील या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी एक्सवर लिहले की, कुवेत शहरातील आगीची घटना दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बाधितांना मदत करण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT