Majhi Ladki Bahin Yojana : अर्ज न भरलेल्यांसाठी गुड न्यूज! अदिती तटकरे म्हणाल्या, 'आता...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme application date will be extended mukhyamantri ladki bahin yojana aditi tatkare eknath shinde ajit pawar
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली

point

महिलांना अर्ज करण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

point

आता अर्जाची शेवटची तारीख काय?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या (Applicant Women) खात्यात येत्या 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत अद्यापही या योजनेत अर्ज न केलेल्या महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ केली आहे. त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी आणखीण कालावधी मिळणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme application date will be extended mukhyamantri ladki bahin yojana aditi tatkare eknath shinde ajit pawar)

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीनंतर विविध कागदपत्रे, सरकारी दाखले मिळवणे आणि बँक खात्याशी आधार जोडणी अद्याप महिलांची बाकी आहेत. त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यास उशीर होणार आहे. हे पाहता आता सरकराने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ दिली आहे.  लाडकी बहीण योजनेत दिलेली 31 ऑगस्ट  मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला व  बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : Gold Price Today: सोन्याने खाल्ला खूपच भाव! 1 तोळ्याची किंमत ऐकूनच फुटेल घाम

लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र ही मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर देखील महिलांना अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. 

हे वाचलं का?

विशेष मोहिम राबविण्याचे आवाहन 

महिला व  बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी आणि  येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडून घ्यावेत असे आदेश दिले आहेत. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis: "अरे वेड्यांनो...", देवेंद्र फडणवीस महायुतीतील वाचाळ नेत्यांवर संतापले

लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या आणि बँक खाती आधारकार्डशी जोडलेल्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे हफ्ते जमा होणार आहेत. ज्या महिलांची बँक खाती आधारकार्डशी जोडलेली नाही आहेत. त्यांच्या खात्याशी आधारकार्ड जोडणी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधारची जोडणी करून घ्यावीत. तसेच लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT