Lok Sabha : महाराष्ट्रात EVM नाही मतपत्रिकेवर होणार निवडणूक?, कलेक्टरने का धाडलंय निवडणूक आयोगाला पत्र?

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 ballot paper instea odf evm dharashiv collector sachin ombase letter to election commision maratha reservation manoj jarange patil
आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
social share
google news

Lok Sabha Election 2024, Maratha Candidate :गणेश जाधव, धाराशिव : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. अशात आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईव्हीएमऐवजी (EVM) मतपत्रिकेवर (Ballet Paper) निवडणुका घ्याव्या लागतील. यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहेत. या पत्राच्या माध्यामातून ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. यावर आता निवडणूक आयोग काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (lok sabha election 2024 ballot paper instea odf evm dharashiv collector sachin ombase letter to election commision maratha reservation manoj jarange patil) 

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाने उमेदवार उभे केल्यास ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावा लागणार आहेत. त्यामुळे मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल. तसेच अधिकारी, वाहन, अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी देखील येणार आहेत. उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार, घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी पत्रातून निवडणूक आयोगाला सांगितले आहे. 

हे ही वाचा : 'BJP ने आमचा केसाने गळा..', रामदास कदमांचा उघडउघड हल्ला

यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले असुन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहले आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून देत मार्गदर्शन मागविले आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय मार्गदर्शन करते याकडे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असुन बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर / मतपत्रिकावर निवडणूक घ्यावी लागते. एका मतदार संघात जास्तीत जास्त 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात. त्यात एका मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार ईव्हीएमवर निवडणुक घेता येतात त्यानंतर अधिक उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर निवडणुक घ्यावी लागते.

हे ही वाचा : प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांसमोर ठेवली 'ही' अट, तब्बल...

मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असुन मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर ग्रामपंचायतमध्ये ठराव व बैठकांचे सत्र सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला तिथे लोकवर्गणी करुन 3 उमेदवार सर्वानुमते उभे केले जाणार आहेत. 

ADVERTISEMENT

तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे आज उमेदवारीबाबत बैठक होणार आहे, तर भुम येथेही बैठकाचे सत्र सुरु आहे. प्रत्येक गावात एक उमेदवार उभा केला जाणार आहे. त्यामुळे धाराशिवमधुन 1 हजार उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. 384 इतक्या पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागले. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT