Loksabha Election : येत्या 16 एप्रिलला लोकसभेचं मतदान होणार?, ‘त्या’ पत्रामागचं खरं सत्य काय

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 held on 16 april election commision clarifies delhi ceo office
lok sabha election 2024 held on 16 april election commision clarifies delhi ceo office
social share
google news

Loksabha Election 2024 Date : लोकसभेच्या निवडणूका येत्या 16 एप्रिलला होणार असल्याचे वृत्त आता हाती आले आहे. या संबंधित निवडणूक आयोगाचे एक पत्रही व्हायरल होत आहे. या पत्रात लोकसभेच्या निवडणूकीची तारीख 16 एप्रिल 2024 ठरल्याचे सांगण्यात आले होते. या पत्रानंतर लोकसभेच्या निवडणूकीच्या तारखेची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभेच्या निवडणूकीची ही तारीख फेटाळून लावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (lok sabha election 2024 held on 16 april election commision clarifies delhi ceo office)

ADVERTISEMENT

आज मंगळवारी निवडणूक आयोगाच एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या व्हायरल पत्रानंतर आगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या तारखेची चर्चा रंगली होती. त्याच झालं असं की व्हायरल पत्रात निवडणूक आयोगाने 16 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिल्लीच्या 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवले होते. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या पत्रात म्हटले आहे की,16 एप्रिल 2024 चा मतदानाचा दिवस तात्पुरता नियुक्त केला आहे.

हे ही वाचा : Ram Mandir : ‘6 डिसेंबरच्या रात्री गुपचूप खाल्ले होते केशरी पेढे’, IAS मनिषा म्हैसकरांची पोस्ट व्हायरल

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

दिल्लीच्या सीईओ कार्यालयाने या व्हायरल पत्रावर आता स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीच्या सीईओ कार्यालयाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, निवडणूक आय़ोगाच्या पत्राचा दाखला देत, येत्या 16 एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहेत का? असा प्रश्नन अनेक प्रसिद्धी माध्यम विचारत आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणूकीची ही तारीख दिल्लीच्या सीईओ कार्यालयाने फेटाळली आहे. ही तारीख केवळ ECI च्या निवडणूक नियोजकानुसार कामांची आखणी करण्यासाठी अधिकार्‍यांसाठी ‘संदर्भासाठी’ नमूद करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिल्लीच्या सीईओ कार्यालयाने दिले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Palghar: नातवाने घेतला आजीचाच जीव, कारण फक्त ती म्हणाली; पोरा…

दरम्यान लोकसभा निवडणुकी संदर्भातील अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे.मात्र एप्रिल किंवा मे महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 2019ची लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यात झाली होती. 11 एप्रिलला निवडणुका सुरू झाल्या होत्या त्या निवडणुका 19 मेला संपल्या होत्या. आणि या निवडणूकीचा निकाल 23 मे ला लागला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT