Maharashtra APMC Election Result LIVE: महाराष्ट्रात बाजार समितींवर कोणाचा झेंडा?, निकालाचा धुरळा
राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल आज (29 एप्रिल) जाहीर केला जात आहे. पाहा निवडणूक निकालाचे LIVE UPDATE:
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यभरात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. काही बाजार समितींच्या निवडणुका काल पार पडल्या असून त्यांचा निकाल आज (29 एप्रिल) जाहीर होत आहे. तर काही बाजार समितींच्या निवडणुका या 30 एप्रिल रोजी होणार आहेत. काल पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींवर सत्ता मिळविणं हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं बनलं आहे. त्यामुळेच आता या सगळ्यात राजकीय पक्ष देखील आपलं लक्ष घालत आहे. ज्यामुळे या निवडणुकांना देखील अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. (maharashtra 147 apmc election result live updates bjp vs mva)
जाणून घ्या बाजार समितींच्या निवडणुकीचे नेमके निकाल
- रामटेक (नागपूर) कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल
नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटाच्या सर्व चार जागांवर भाजप समर्थित पॅनेलला यश. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि स्थानिक काँग्रेस नेते आणि सुनील केदार यांचे विरोधक गज्जू यादव यांनी संयुक्तपणे शेतकरी विकास पॅनल लढवले होते.
काँग्रेस नेते सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या पॅनलचा पराभव.
- मंगळवेढा
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार समाधान आवताडे गटाचे वर्चस्व