Maharashtra Board Class 10th Result 2024 Out: दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर, इथे पाहा तुमची Marksheet

मुंबई तक

ADVERTISEMENT

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर, इथे पाहा तुमची Marksheet
दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर, इथे पाहा तुमची Marksheet
social share
google news

Maharashtra SSC Result 2024 Online Result : पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result 2024) आज (27 मे) जाहीर करण्यात आला. राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निकालाची विभागवार आकडेवारी जाहीर करण्यात आली. तर दुपारी 1 वाजेपासून प्रत्यक्ष निकाल ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. (maharashtra board class 10th result 2024 out 10th online result declared check your marksheet here)

ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना आपला निकाल https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे ऑनलाइन पाहता येईल. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल जाहीर केला जातो. त्याचप्रमाणे यंदा देखील जाहीर करण्यात आला आहे. यंदा, राज्यभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाली होती आणि 26 मार्च 2024 रोजी संपली होती. 

या वेबसाइट्सवर पाहता येणार दहावीचा निकाल

mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
results.digilocker.gov.in

हे वाचलं का?

Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाबद्दल या गोष्टी वाचा...

 

ADVERTISEMENT

मुलींचा निकाल किती टक्के? 97.21%
मुलांचा निकाल किती टक्के लागला? 94.56%
कोणत्या मंडळाचा निकाल सर्वाधिक? कोकण (99.01%)
कोणत्या मंडळाचा निकाल सर्वात कमी? नागपूर (94.73%)
महाराष्ट्राचा निकाल किती टक्के लागला? 99.01%
100 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या किती? 9,382

 

ADVERTISEMENT

वेबसाइटवर कसा पाहायचा 10वीचा निकाल?

  • mahahsscboard.in, ahresult.nic.in, sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येईल.
  • अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.
  • समजा, तुमचा सीट नंबर M587469 असेल आणि तुमच्या आईचे नाव स्मिता असं असेल तर तुम्ही M587469 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SMI असं टाकावं लागेल.
  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT