Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, प्रजासत्ताक दिनी पावसाची सलामी? इथं बसरण्याची शक्यता
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात काही प्रमाणात बदल जाणवण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल्यास सकाळी धुके तर दुपारनंतर उन्हाचे चटके सहन करावे लागतील. दरम्यान 26 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असेल अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील हावामानात काही प्रमाणात बदल
काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल्यास सकाळी धुके तर दुपारनंतर उन्हाचे चटके
उत्तर महाराष्ट्रात स्थिती काय?
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात काही प्रमाणात बदल जाणवेल अशी शक्यता अधिक आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल्यास सकाळी धुके तर दुपारनंतर उन्हाचे चटके अधिक सहन करावे लागतील. दरम्यान 26 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असेल अशी शक्यता आहे.
हे ही वाचा : नालासोपाऱ्यात आईने 15 वर्षाच्या मुलीची दगडी जात्याने डोकं ठेचून केली हत्या, खूनाचं कारण आलं समोर
कोकण :
कोकणात अंशत: ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये सकाळी धुक्याचं प्रमाण जाणवू शकते. उष्णता देखील जाणवणार आहे. यामुळे काही प्रमाणात थंडावा कमी असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरुपाचे असणार आहे. तसेच परिसरात धुक्याची चादर पसरेल. दिवसभर कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी काही प्रमाणात गारठा तर दुपारी उष्णता जाणवेल.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात सकाळी धुक्यांसह काही प्रमाणात ढगाळ वातावरण जाणवेल. छत्रपती संभाजीनगरात सकाळी धुक्यांसह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. हवामानात काही प्रमाणात चढ उतार जाणवण्याची शक्यता अधिक आहे.










